जाणून घ्या. कुष्ठरोगाबाबतचे समज-गैरसमज

जाणून घ्या. कुष्ठरोगाबाबतचे समज-गैरसमज

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन- कुष्ठरोग हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे. याचा परिणाम त्वचा, हातातील आणि पायातील परिघवर्ती चेता ,नाकाची अंतत्वचा, घसा आणि डोळ्यावर होतो. चेतांच्या टोकावर परिणाम झाल्याने परिणाम झालेल्या भागाची संवेदना नष्ट होते. संवेदना नाहिशी झाल्याने हाता पायाची बोटे वाकडी होतात. किंवा गळून पडतात. हात पाय विद्रूप होणे. हे या रोगात प्रामुख़्याने आढळते. या आजारावर आता उपचार उपलब्ध असल्याने हा आजार ५-६ महिन्यात पूर्ण बरा होतो. हा आजार जुना असल्याने या बाबत अनेकांचे समज गैरसमज आहेत. परंतु हा आजार आता बरा होत असल्यामुळे लोक याबद्दल सकारात्मक विचार करायला लागले आहेत.

* कुष्ठरोगाबद्दलचे समज-गैरसमज खालीलप्रमाणे *

अनेकांचा असा समज असतो. कि, कुष्ठरोग हा आजार आनुवंशिक आहे. मागच्या जन्मी पाप केल्याने हा आजार होतो. आणि नवसाने, तंत्र, मंत्र करून हा आजार बरा करता येतो. परंतु, हा लोकांचा सर्वात मोठा गैरसमज आहे. खरं म्हणजे कुष्ठरोगाविरुद्धच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीमुळे हा आजार होणे अशक्य आहे. हा आजार फक्त प्रतिकारशक्ती कमी असलेल्या केवळ २ टक्के लोकांनाच होऊ शकतो.आणि या आजारावर प्रभावीपणे उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे हा आजार आता ६ महिन्यात बरा होऊ शकतो.

* या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी उपाय *

कुष्ठरोग्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीला या आजाराचा संसर्ग होऊ नये. यासाठी रिफॅम्सीन हे औषध दिले जाते. या औषधांमुळे कुष्ठरोगाचा संसर्ग होणे टाळता येते. हे औषध अनेक राज्यात उपलब्ध आहे. त्यामुळे कोणाला जर या आजराचे लक्षण आढळले. तर लगेच ही लस देता येते. त्यामुळे या आजाराचा संसर्ग होत नाही. त्यामुळे कुष्ठरोग्यांचा द्वेष करणे किंवा त्यांच्यापासून लांब राहणे योग्य नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु