एकाग्रता आणि सर्जनशिलता वाढविण्यासाठी ‘हा’ उपाय करा, जाणून घ्या

एकाग्रता आणि सर्जनशिलता वाढविण्यासाठी ‘हा’ उपाय करा, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोणत्याही कामात एकाग्रता खुप आवश्यक असते. परंतु, ही एकाग्रता कशी मिळवावी हे सुद्धा जमणे आवश्यक ठरते. जर एकाग्रता वाढली तर तुम्हाला कामाचा आनंदही मिळू शकतो. माइंडफुलनेस मेडिटेशन करून तुम्ही एकाग्रता मिळवू शकता.

एकाग्रता
एखाद्या गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रीत होणे म्हणजे एकाग्रता होय. एकाग्रता वाढवण्यासाठी रोज मेंदूच्या या व्यायामासाठी किमान पाच मिनिटे द्यायला हवीत. केवळ एकाग्रता वाढवण्यासाठी प्रयत्न केले तर त्याचे काही दुष्परिणाम होतात. फोकस्ड मेडिटेशन केल्यास एकाग्रता वाढते पण सर्जनशीलता कमी होते, असे आधुनिक संशोधनात आढळत आहे.

समग्रता, सजगता आवश्यक
सर्जनशीलतेसाठी काहीतरी नवीन सुचणे, एखादा वेगळा विचार मनात येणे गरजेचे असते. एकाग्रतेचा सराव करताना मनात येणारे अन्य विचार आपण खुडून टाकत असतो, त्यावेळचे तेच ध्येय असते. पण सतत असेच करीत राहीलो तर नवीन, वेगळे विचार मनात येणे कमी होते, जे सर्जनशीलतेसाठी मारक आहेत. नाविन्यपूर्ण कल्पना सुचण्यासाठी एकाग्रता पुरेशी नसते, समग्रता आणि सजगता आवश्यक असते. ती विकसित करण्यासाठी सजगता ध्यान करावे. त्यालाच माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु