‘या’ कारणामुळे वाढते वजन, जाणून घ्या

‘या’ कारणामुळे वाढते वजन, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्याच्या वाढत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन वाढत चालले आहे आणि वाढत्या वजनामुळे अनेक आजार तोंडवर काढत आहेत. वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. पण आपण हा विचार कधीच करत नाही. की आपलं वजन नेमकं का वाढत. आपण जर हा विचार केला तर आपल्याला वजन कमी कसे करायचे हा विचार करण्याची गरज नाही. त्यामुळे जाणून घेऊया की आपलं वजन का वाढत.

१) रात्री उशीरापर्यंत जागणे आणि तणावाखाली काम करीत राहण्याने शरीरातल्या काही यंत्रणांवर दबाव येतो. हा दबाव आपले वजन वाढण्यास कारणीभूत ठरतो.

२) आरोग्याचे सल्ले देणारे लोक आपल्याला अधिक पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण किती पाणी प्यावे हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून असते. सल्ला ऐकून काही लोक फारच पाणी प्यायला लागतात. या जादा पाण्यानेही वजन वाढत असते. तणावाखाली जगणे हेही वजन वाढण्याचे कारण आहे असे दिसून आले आहे.

३) तुम्ही व्यायामापासूनजेवढं लांब पळाल तेवढी तुमच्या आरोग्याची हानी होईल. त्यामुळे दररोज एक्सरसाइज करणं गरजेचं असतं. एक्सरसाइज केली नाही तर शरीरातील कॅलरी बर्न होणार नाही आणि फॅट्सचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.

४) आरोग्य जपण्यासाठी हेल्दी डाएट घेणं अत्यंत आवश्यक असतं. जर तुम्ही आहारामध्ये प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करत नसाल तर, त्यामळेही तुमच्या शरीराचं वजन वाढतं. जेवणामध्ये दूध, दही किंवा अंड्यांचं सेवन अवश्य करा. असं केलं नाही तर, शरीरातील मेटाबॉलिज्म प्रोसेस स्लो होते आणि वजन वाढू लागतं.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु