महिलांनो सावधान ! ‘पीसीओएसडी’मुळे जडतात मानसिक विकार, ‘हे’ आहेत 4 परिणाम

महिलांनो सावधान ! ‘पीसीओएसडी’मुळे जडतात मानसिक विकार, ‘हे’ आहेत 4 परिणाम

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पीसीओएसडी म्हणजेच पॉलिसिस्टीस ओव्हरी डीसीज होय. हा आजार महिलांशी संबंधित आहे. जगभरात ५ ते १० टक्के महिलांना हा आजार जडला आहे. या आजाराचे स्वरूप, परिणाम मोठे असल्याने त्यावर शास्त्रज्ञ सतत संशोधन करत असतात. याच पीसीओएसडीमुळे मानसिक विकार जडत असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच महिलांनी या आजाराची गंभीर दखल घ्यावी असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

हे आहेत परिणाम

१. वंध्यत्व, अनियमित पाळी, शरीरावर अनावश्यक केस यासारखे परिणाम दिसतात.

२. या आजाराशी सामना करता करताच जर मूल जन्माला आले तर बाळाच्या मेंदूच्या विकासावरही परिणाम होतो.

३. गरोदरपणात महिलांच्या शरीरात टेस्टोस्टेरोन या संप्रेरकाची पातळी वाढली तर त्याचा परिणाम गर्भाच्या मेंदू विकासावर होऊन मुलांमध्ये ऑटिझम नावाचा विकारही विकसित होवू शकतो.

४. पीसीओएसडीची लक्षणे असलेल्या महिलांमध्ये मानसिक असंतुलन आढळून येते. या महिलांमध्ये भीतीग्रस्तता, विमनस्कता म्हणजेच डिप्रेशन आढळते.

* पीसीओएसडी म्हणजे काय?

या आजारात महिलांच्या शरीरात पुरूषी संप्रेरकांचे प्रमाण वाढते. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या प्रजोत्पादन क्षमतेवर होतो. पाळी अनियमित होते. चेहरा आणि शरीरावर इतरत्र अनावश्यक केस, काळे डाग वाढतात. या अभ्यासात पी. सो. ओ. एस. मुळे जगभरात १७००० महिलांना मानसिक असंतुलनाला तोंड द्यावं लागत आहे.

हे आहेत उपचार

* ज्या मुलींमध्ये, महिलांमध्ये पीसीओएसडीची लक्षणे आढळल्यास ताबडतोब औषधोपचार करावेत.
* या आजारामुळे होत असलेल्या मानसिक आजारावरही मानोसापचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत.
* या विकाराशी अशा दोन्ही पातळीवर उपचार घेतल्यास दुष्परिणामांची तीवता मोठ्या प्रमाणात कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु