जाणून घ्या – पायात ‘चांदीचे पैंजण’ घालण्यामागचे शास्त्रीय कारणं 

जाणून घ्या – पायात ‘चांदीचे पैंजण’ घालण्यामागचे शास्त्रीय कारणं 
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पैंजण हा सोळा शृंगारातील एक प्रकार आहे. मात्र पैंजण घालण्याचा हेतू केवळ स्रियांच्या पायांचे सौंदर्य वाढवणे नसून त्यांचे आरोग्य चांगले राहावे हा त्यामागचा मूळ उद्देश आहे.पायात कधीही सोन्याचे पैंजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते.

कंबरेच्या वरिल भागात सोन्याचे दागिने आणी कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत असा शास्त्रीय नियम आहे . म्हणून पायात नेहमी चांदीचेच पैंजण घालावे. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणी शितलतेचे संतुलन राहते.

जाणून घ्या पायात चांदीचे पैंजण घालण्यामागची शास्त्रीय कारणे –

पैंजण घालण्याचे फायदे –

पायात पैंजण घातल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
चांदीचे पैंजण शरीरातील लिम्फ ग्रंथींना सक्रिय करतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पैंजणांच्या नियमित वापराने हार्मोनल इम्बॅलन्स यांसारख्या समस्या दूर होतात. पैंजण  पायाला घासले जातात. यामधून चांदी धातूचे तत्व शरीरात प्रवेश करतात.

ज्या महिलांना पायाच्या सूजेचा त्रास होतो त्यांनी चांदीची पैंजण घातल्यास लाभ होतो. यामुळे रक्ताभिसरण वाढते तसेच पायांची सूज कमी व्हायला मदत होते.

पैंजण पायातून निघणारी शारीरिक विद्युत उर्जा शरिरात संरक्षित ठेवते.
पैंजणांच्या नियमित वापराने पाठ आणि इतर हाडांच्या दुखण्यापासून बराच आराम मिळतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु