जे. जे. रूग्णालयात आता कर्करोगावरही उपचार

जे. जे. रूग्णालयात आता कर्करोगावरही उपचार

आरोग्यनामा ऑनलाइन – कर्करोगवरील उपचार आता मुंबईतील जे. जे. रूग्णालयातही उपलब्ध झाले आहेत. कारण या उपचारांसाठी राज्य सरकारच्या पुढाकारानं जे. जे. आणि टाटा मेमोरिअलमध्ये सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार जे. जे. रुग्णालयात हेड अँड नेक कर्करोगावरील उपचारासाठी स्वतंत्र ओपीडी सुरू  झाली आहे. राज्यात हेड अँड नेक कर्करोगाचं प्रमाण जास्त असून खासगी रुग्णालयातील कर्करोगावरील उपचार सर्वसामान्यांना परवडत नाहीत. भयंकर म्हणजे अनेक रुग्णांना हे उपचार घेणं आर्थिकदृष्या शक्य नसल्याने ते उपचार घेणं टाळतात. यापैकी अनेक रूग्णांना जीवाला मुकावे लागते. परंतु, आता या रुग्णांना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार उपलब्ध झाले आहेत.

चाचणी अहवालात कॅन्सर असल्याचं निदान झाल्यास रुग्णालयात या रुग्णांवर उपचार केले जातात. आतापर्यंत ५० हून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जे. जे. रुग्णालयात कॅन्सर रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाते. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील रुग्णांसाठी हे शक्य आहे. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील कर्करुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी याठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा नसल्याने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. दर सोमवारी आणि बुधवारी टाटा रुग्णालयातील डॉक्टर जे. जे. रुग्णालयात येऊन कर्करुग्णांवर उपचार करत आहेत. हेड अँण्ड नेक ओपीडीद्वारे १० एप्रिलला १२ रुग्णांवर उपचार करण्यात आलेत.

या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज पडल्यास ही शस्त्रक्रिया जे. जे. मध्येच केली जाईल. या रुग्णालयातील डॉक्टरांना कॅन्सरबाबत प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. टाटा रुग्णालयातील डॉक्टरांची टीम जे. जे. रुग्णालयात येऊन कर्करुग्णांवर उपचार करत आहे. या करारामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत कर्करुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळत आहेत. औपीडी सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी १२ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. हेड अँण्ड नेक कॅन्सरग्रस्तांची संख्या सध्या झपाट्यानं वाढते आहे. जे.जे., जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या २०० रुग्णांपैकी १५ ते २० जणांमध्ये कॅन्सरची लक्षणं आढळून येतात. या रुग्णांना कॅन्सर तज्ज्ञांकडे पाठवून चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु