महिन्यात पुन्हा एकदा मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय

महिन्यात पुन्हा एकदा मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एका महिन्यात दोनदा मासिक पाळी आल्यास कमजोरी येऊ शकते. काही महिलांना दिर्घकाळ ही समस्या सुरू असते. वेळीच उपचार केले नाही तर यूटरस कॅन्सरसारखा गंभीर आजार यामुळे होऊ शकतो. शरीरात हार्मोनस संतुलन बिघडल्यास एका महिन्यात दोन वेळा मासिक पाळी येते. ही समस्या झाल्यास औषध घेण्याऐवजी नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन नियंत्रण करता येते.

जास्त तणावात राहिल्यामुळे हार्मोन संतुलन बिघडते. यामुळे एका महिन्यात दोनदा पीरियड्स येतात. तसेच जंक फूड खाल्ल्यानेही हा त्रास होतो. जास्त तळलेले पदार्थ किंवा जंक फूड खाल्ल्याने त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. यामुळे पीरियड्स निमयित येत नाही. तसेच सिगारेट ओढणे, दारु पिणे यामुळे पीरियड्सची समस्या होऊ शकते. यामुळे हार्मोन लेव्हल बॅलेन्स राहत नाही. यामुळे ही समस्या वाढते. अनेकदा दिर्घकाळगर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने एका महिन्यात दोन वेळा पाळी येऊ शकते. तसेच काही औषधे एस्टड्ढोज आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनवर प्रभाव टाकतात. यामुळे एका महिन्यात दोनदा पाळी येऊ शकते.

हे उपाय करा
अननस खाल्ल्याने पेल्विक एरियाच्या मसल्स रिलॅक्स मासिक पाळी सामान्य होते. अद्रकमुळे पीरियड्सच्या काळात होणा-या वेदनांपासून आराम मिळतो. खसखसचे दूध घेतल्याने मासिक पाळी सामान्य होते. कंबरदुखीपासून आराम मिळतो. तसेच पपई सेवन केल्यास पीरियड्सच्या काळातील कमजोरीपासून बचाव होतो. शिंगाड्याचा हलवा खाल्ल्याने पीरियड्स बंद होतात. हे दूधासोबत घेतल्याने लवकर फायदा होतो. दिवसातून तीन वेळा तांदूळाचे पाणी प्यायल्याने पीरियड्स बंद होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु