पुरूषांनी टोमॅटोचे नियमित सेवन केल्यास होणार नाही ‘हा’ आजार

पुरूषांनी टोमॅटोचे नियमित सेवन केल्यास होणार नाही ‘हा’ आजार

आरोग्यनामा ऑनलाइन – बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. यामुळे खाद्यपदार्थांना स्वाद वाढतो. जे पुरुष रोज टोमॅटो नियमित सेवन करतात, त्यांच्यात निम्म्यापेक्षा जास्त स्किन कॅन्सरचा धोका कमी होत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.

संशोधन आणि निष्कर्ष

संशोधनात काही पुरुषांच्या आहारात ३५ आठवड्यापर्यंत संपूर्ण आहाराच्या १० टक्के टोमॅटो पावडर देण्यात आली. त्यानंतर त्यांना उन्हात सोडले गेले. संशोधनात टोमॅटो न सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत सुमारे ५० टक्के पुरुषांमध्ये स्किन कॅन्सरचा धोका कमी झाल्याचे आढळले.

टोमॅटोला रंग देणारे एलीमेंट्स डायटरी कॅरोटिनॉयड्स स्किनला अल्ट्रावॉयलेट रेजपासून बचाव करतात. यामुळे कॅन्सर होत नाही.

टोमॅटो पेस्ट सेवन केल्याने सनबर्न कमी होतो. कारण यातील कॅरोटिनॉयड्स पुरुषांच्या त्वचेत जमा होतात. हे अल्ट्रावॉटलेट किरणांपासून संरक्षण करतात.

टोमॅटोत लायकोपीन, प्रायमरी कॅरोटिनॉयड्स आहेत जे सर्वात जास्त फायदेशीर अ‍ॅन्टीऑक्सीडेंट आहेत.

Visit : Arogyanama.com 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु