प्रथमच जीममध्ये जाताय ? ‘या’ 5 गोष्टींचा करू नका संकोच, जाणून घ्या कोणत्या

प्रथमच जीममध्ये जाताय ? ‘या’ 5 गोष्टींचा करू नका संकोच, जाणून घ्या कोणत्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बॉडी बनविण्यासाठी अनेक तरूण जिममध्ये जातात. परंतु, अशा तरूणांची तब्येत किरकोळ अथवा जास्त फॅट असल्यास त्यांना प्रथम संकोचल्या सारखे वाटते. अशा अवघडलेल्या वातावरणात संकुचित मनाने वर्कआउट केल्यास जिमचा फायदा लवकर होणार नाही. यासाठी जीममध्ये जाताना अशा गोष्टींचा अजिबात संकोच करू नये.

या गोष्टींचा करू नका संकोच
१.
जीममध्ये ब्रॅन्डेड कपडे घातल्याने वजन कमी होत नाही हे लक्षात ठेवा. कपडे स्वच्छ व आरामदायक असणे महत्वाचे आहे. त्याबाबत संकोच वाटण्याचे काहीच कारण नाही. इतरांच्या कपड्यांशी तुमच्या कपड्यांची तुलना करू नका. मोकळेपणाने व आत्मविश्वासाने वावरा.

२. जीममधील चांगल्या स्वभावाच्या व्यक्तींशीच बोला. तिथे तुमच्याशी कोणी नीट बोलत नसेल तर ठिकच आहे. कारण तुम्ही तिथे मैत्री करण्यासाठी जात नाही.

३. जीममधील इतरांचा स्टॅमिना तुमच्यापेक्षा जास्त असू शकतो. कारण ते तुमच्या आधीपासून तेथे आहेत. त्यांच्या स्टॅमिनाशी तुमची तुलना करू नका. तुमचा स्टॅमिना हळूहळू व दररोज व्यायाम करुन वाढू लागेल.

४. तुमचे वजन इतरांपेक्षा जास्त असेल तर संकोच वाटू देऊ नका. इतरांचेही वजन जीम जॉइन करतेवेळी जास्त असेल. जीममधील फीट लोकांकडे पाहून स्वत:बद्दल लाज वाटून घेण्यापेक्षा त्यांच्याकडून प्रेरीत व्हा. व्यायामाला लागा.

५. प्रत्येक मशिनबाबत योग्य माहिती घ्या. कारण तज्ञांच्या मदतीशिवाय एखादे मशिन वापरले तर दुखापत होऊ शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु