तिशीच्या आतच घ्या आरोग्य विमा

तिशीच्या आतच घ्या आरोग्य विमा

आरोग्यनामा ऑनलाइन तिशीच्या आतच आरोग्य विमा काढल्यास हा चांगला निर्णय ठरू शकतो. यामुळे कोणत्याही मेडिकल इमरजन्सीला सहज तोड देता येऊ शकते. कमी वयात आरोग्य विमा खरेदी केल्यास प्रिमिअम कमी बसणार आहे. जर २५ व्या वर्षी आरोग्य विमा खरेदी केला तर ५ हजार रुपये वार्षिक द्यावे लागतात.तर ३५ व्या वर्षी हिच रक्कम सुमारे ६ ते ८ हजारापर्यंत जाते.

आरोग्य विमा काढणे फायद्याचे असते कारण अचानक एखादा आजार उद्भवल्यास उपचारांसाठी लाखो रुपये लागतात. आरोग्य विमा असल्यास उपचार करणे सोपे जाते. मानसिक त्रासही होत नाही. आरोग्य विमा कमी वयात खरेदी केल्यानंतर पहिल्या वर्षी आजारपण आलेच नाही तर पुढील वर्षी नुतनीकरण करताना विम्याची सुरक्षा रक्कम वाढते. यास बोनस असे म्हणतात.

जर तीन लाखांचा विमा असेल तर पुढील वर्षी कमी प्रिमिअममध्ये हा विमा ४ किंवा ५ लाखांचा होतो. बरेचजण नोकरी करत असलेली कंपनी देत असलेल्या विम्यावरच अबलंबून राहतात. मात्र, नोकरीत बदल झाल्यास हे कव्हर जाते. अशा वेळी कुटुंबात आजारपण आल्यास त्याचा फटकाही बसू शकतो. या कंपन्या ५० हजारांपासून ५ लाखांपर्यंत विम्याचे संरक्षण देतात, जे भविष्यात कमी पडू शकते. यामुळे खासगी विमाही काढलेला फायद्याचा ठरतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु