मोफत नेत्र तपासणी शिबिरात १८९ नेत्र रुग्णांची तपासणी

मोफत नेत्र तपासणी शिबिरात १८९ नेत्र रुग्णांची तपासणी

उदगीर : आरोग्यनामा ऑनसाईन – उदगीर तालुक्यातील हाळी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरात १८९ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच ५४ मोतीबिंदू, ९ काचबिंदू व १६ टेरिझम रुग्णांना डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घेण्याबाबत सल्ला देण्यात आला. महाड चवदार तळे सत्याग्रह क्रांती दिनानिमित्त शाहू-फुले-आंबेडकर सेवाभावी संस्था, हाळी व उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय, उदगीर यांच्या वतीने हाळी येथील तक्षशिला बुद्ध विहारात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

उदयगिरी रुग्णालयातील डॉ. हणमंत गव्हाणे, डॉ. सचिन निलंकर यांच्यासह मारोती गायकवाड, प्रशांत साबणे, नजीर शेख यांनी रुग्ण तपासणीस सहकार्य केले. यावेळी मंचावर सरपंच प्रज्ञाताई कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष एस. डी. कांबळे, प्रा. डॉ. अतुल धावारे, माजी जि. प. सदस्य दयानंद कांबळे उपस्थित होते. शिबिरासाठी इतिहास कांबळे, शकील बेग, कुमार मसुरे, डी. आर. कांबळे, प्रशांत सूर्यवंशी, बब्रुवान माने, आतिष कांबळे, सदाशिव मसुरे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन अमोल मसुरे यांनी केले.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु