गर्भपाताची औषधे विकणाऱ्या ऑनलाईन पोर्टलविरोधात एफआरआय(FIR)

 
गर्भपाताची औषधे विकणाऱ्या ऑनलाईन पोर्टलविरोधात एफआरआय(FIR)

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एक ऑनलाईन कंपनी गर्भपाताची औषधे घरपोच पाठवत असल्याचे निदर्शनास आल्याने या कंपनीविरोधात एफडीएच्या ड्रग कंट्रोलरद्वारे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऑनलाईन औषधविक्रीवर बंदी आहे. असे असताना खुलेआम ऑनलाईन औषध विक्री सुरु आहे.

ऑनलाईन औषध विक्री बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जातेय का, हे तपासण्यासाठी महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी काही दिवसांपूर्वी गर्भपाताच्या गोळ्या मागवल्या. ही ऑर्डर नोंदविल्यानंतर त्यांना गर्भपाताच्या गोळ्या घरपोच मिळाल्या. याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील पेणच्या कामोठे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याबाबत पेणच्या अन्न आणि औषधे प्रशासनातील औषध नियंत्रक मुकुंद डोंगळीकर यांनी सांगितले की, ऑनलाईन औषधविक्री करणे बेकायदेशीर असून अशा विक्रीबाबत अजून कोणताही कायदा नाही. कामोठे पोलीस ठाण्यात या घटनेबाबत एफआयआर दाखल केली आहे. औषध विक्रेता आणि अ‍ॅमेझॉनवर कारवाई करण्यात आली आहे. ही औषधे उत्तर प्रदेशहून आल्यामुळे यासंदर्भातील पुढील तपास पोलीस करणार आहेत.

तर महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे म्हणाले, मी अ‍ॅमेझॉन या ॲानलाईन पोर्टलवरून गर्भपाताची जी औषधे मागवली होती ती स्त्रीरोग तज्ज्ञांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देणे चुकीचे आहे. मला ही औषधे कोणत्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळाली आहेत. यासंदर्भात एफडीए अधिकाऱ्यांना याची माहिती दिली असून कंपनीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु