पर्यावरण चांगले तर आरोग्यही उत्तम

पर्यावरण चांगले तर आरोग्यही उत्तम

आरोग्यनामा ऑनलाइन – आजूबाजूचा परिसर स्वच्छ राखणे, वातावरण प्रदूषणविरहीत ठेवणे आदी काळजी आपण घेतल्यास पर्यावरण उत्तम राहते आणि त्यामुळे आरोग्यही बिघडत नाही. पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने प्रदूषण वाढली आहे. त्यामुळे प्रदुषित हवेत श्वास घ्याव लागतो. यामुळे अनेक आजार बळावत आहेत. ८५ प्रकारचे आजार होण्यामागील मुख्य कारण हे प्रदूषण आहे. शांत आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी वायू आणि जलप्रदूषण टाळणे महत्वाचे आहे. यासाठी आपण काही उपाय करणे फायदेशीर ठरते.

मलेरिया, कॅन्सरचे काही प्रकार, पोटासंबंधिच्या समस्या आणि श्वसनाशी संबधित इन्फेक्शन, अस्थमा यासारखे आजार प्रदूषित हवेमुळे होतात. वातावरणामध्ये पसरणाऱ्या प्रदूषणामुळे आरोग्यावर अनेक परिणाम होत आहेत. वाढत्या प्रदूषणावर वेळीच आळा न घातल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. स्वच्छ पाण्यासाठी वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काही मानकं तयार केली असून त्यानुसार, १०० ते १५० स्तर टीडीएस असणारे पाणी स्वच्छ असते. आरओ (रिवर्स ऑसमोसिस) किंवा यूवी सिस्टिम यासाठी तपासून घ्याव्यात. अनेकदा मिनरल वॉटर किंवा सप्लाय करण्यात आलेले पाणीदेखील पूर्णपणे शुद्ध नसते. यामध्ये शरीराला नुकसान पोहोचवणारे जीवाणू गियार्डिया असतात. अनेकदा कंपन्या पाणी स्वच्छ करण्यासाठी नदी, नाले, तसेच भूमिगत स्त्रोत इत्यादीमधून पाणी आणतात. हे पाणी स्वच्छ करण्यासाठी कोएगुलेंट केमिकल वापरण्यात येते. हे केमिकल पाण्यामध्ये असणारी घाण स्वच्छ करते. परंतु ते आरोग्यासाठी अत्यंत घातक असते.

प्रत्येकाला जगण्यासाठी श्वास घ्यावा लागतो. प्रदूषित वातावरणामध्ये श्वास घेतल्यास ते आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. यामुळे अनेकांना श्वसानाच्या अनेक विकारांचा त्रास होतो. हवेमध्ये अस्तित्वात असलेले कार्बन मोनोऑक्साइड एखाद्या विषाप्रमाणे असते. आसपास जमा झालेली घाण आणि कचऱ्यामुळे वातावरण प्रदुषित होते. प्लास्टिक अत्यंत हानिकारक असून यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. आजूबाजूचे वातावरण दूषित असेल तर अनेक आजार जडतात. गर्भवती महिला आणि त्यांच्या मुलांवरही याचा परिणाम होतो. शरीराला स्वस्थ आणि उर्जावान बनायचे असेल तर पौष्टिक आहाराचे सेवन गरजेचे आहे. जर प्रदूषित वातावरणामध्ये पौष्टिक आहाराचे सेवन केले तर आरोग्यावर विपरित परिणाम होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु