मशरूम खा… आणि निरोगी रहा

मशरूम खा… आणि निरोगी रहा

पुणे – आरोग्यनामा ऑनलाइन – मशरूम म्हणजे खाण्यायोग्य अशी बुरशी असून यामध्ये व्हिटॅमिन्स आणि पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. आजाराशी लढण्यासाठी हे घटक शरीराला आवश्यक असतात. मशरूममुळे आरोग्य चांगले राहते. मशरूम माती, लाकुड किंवा पेंढ्यावर उगवतात. मशरूमच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी खाण्यायोग्य जाती ओळखता येणे आवश्यक आहे. मशरूमध्ये प्राटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. तसेच व्हिटॅमिन बी सह सेलॅनियम सारखे अ‍ॅण्टी ऑक्सिडेंटही आहेत. मशरूम पचनसंस्था अधिक बळकट करते. कॅन्सरला प्रतिबंध करण्याची क्षमताही मशरूममध्ये असल्याचे म्हटले जाते. तसेच ते शक्तिवर्धकही मानले जाते.

मशरूममुळे पुरूषांमधील सेक्स हार्मोन्स टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढते. अल्झायमरसारख्या आजारातही मशरूम अधिक फायदेशिर ठरू शकतात. कॉलेस्ट्रॉलचे प्रमाणही यामुळे कमी होते. मशरूममधील ५० टक्के घटक तंतूमय कर्बोदकं असतात. ज्यामुळे आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया तयार होतात आणि पचनक्रिया सुरळीत होऊन वजन कमी होण्यास मदत होते. हाय प्रोटिन आणि लो कार्ब डाएटसोबत जर आहारात मशरूमचा समावेश केला तर वजन झपाट्यानं कमी होऊ शकते.

मशरूममध्ये मोठ्याप्रमाणात कॅल्शिअम असते. हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम आवश्यक असतो. शरीराला आवश्यक तितकं कॅल्शिअम मिळाल्यास सांधेदुखी बळावत नाहीत, सांध्यांमधील वेदना दूर होतात. त्यामुळे हाडांसंबंधी आजार दूर ठेवण्यासाठी नेहमी ताजे मशरूम शिजवून खावेत. मशरूममध्ये व्हिटॅमिन डी हा घटक असतो, ज्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या न्यूटिएंट्सचं योग्य शोषण होतं. व्हिटॅमिन डीमुळे फॉस्फरस आणि कॅल्शिअम यांची चयापचय प्रक्रिया वाढते आणि शरीर जलद गतीनं पोषक घटक शोषून घेतं. मशरूममध्ये एर्गोथायोनिन हा अँटिऑक्सिडंट असतो जो फ्री रेडिकल्सपासून संरक्षण देतो. तर त्यातील नैसर्गिक अँटिबायोटिक्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारतं.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु