हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए ! हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए !!

हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए ! हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए !!
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सुफी कवी अमीर खुसरो यांच्या असंख्य रचना आजही वाचल्या जातात. विशेष म्हणजे त्यांनी दोह्यांचा वापर करून आरोग्यासाठी अनेक उपाय लिहीले आहेत. त्यांच्या खास शैलीमुळे हे दोहे अधिक वाचनिय आहेत. साधे घरगुती उपाय करून विविध आजारांना कसे दूर ठेवावे, हे खुसरो यांनी दोहे लिहून सांगितले आहे. अमीर खुसरो यांच्या दोह्यांमधील काही निवडक आरोग्य दोहे आणि त्यांचे अर्थ आपण जाणून घेणार आहोत.

खुसरोंचे दोहे आणि उपाय

प्रात: काल खाट से उठकर, तुरत पिए जो पानी!
वा घर वैद्य कबहूँ न जावे, बात खुसरो ने जानी!!

अर्थ – सकाळी उठल्या उठल्या पाणी प्यायल्याने आपण आजारापासून नेहमी दूर राहतो.

मारन चाहो काऊ को, बिना छुरी बिन घाव!
तो वासे कह दीजियो, दूध से पूरी खाए!!

अर्थ – दुधासोबत पुरी खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

चना चून बिन नोन के, चौंसठ दिन जो खाए!
दाद खाज अरू सेहुवा जरी मूल सो जाए!!

अर्थ – हरभऱ्याच्या पीठाच्या पोळीत मीठ न टाकता खाल्ल्यास खाज येण्याचा त्रास होऊ शकतो.

सौ दवा की एक दवा, रोग कोई न आवे!
खुसरो वाको सरीर सुहावे, नित ताजी हवा जो खावे!!

अर्थ – सकाळी ताजी हवा घेतल्याने शरीर रोगमुक्त राहते.

हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए!
हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए!!

अर्थ – हरड, बहेडा आणि आवळा हे साखर आणि तूपासोबत खाल्ल्याने शरीर मजबूत होते.

साधुन दासी चारन खाँसी, प्रेम बिना से हाँसी!
खुसरो वाकी बुद्धी विनासे, रोटी खाए जो बाँसी!!

अर्थ – शिळे अन्न खाणे शरीरासाठी हानिकारक आहे.

माटी के नव पात्र में, त्रिफला रैन में डारी!
सुबह, सवेरे धोऐ के, आँख रोग को हारी!!

अर्थ – त्रिफळाच्या पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांचे कोणतेही आजार होत नाहीत.

हरड बहेडा आँवला, तीनो नोन पतंग!
दाँत बजर सो होत है, माँजू फल के संग!!

अर्थ – त्रिफळाच्या पावडरमध्ये मीठ टाकून दात घासल्यास दात मजबूत होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु