‘पेडियाट्रिक सर्जन्स’च्या अध्यक्षपदी डॉ. तोतला

‘पेडियाट्रिक सर्जन्स’च्या अध्यक्षपदी डॉ. तोतला

आरोग्यनामा ऑनलाईन – महाराष्ट्र असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जन्सच्या अध्यक्षपदी औरंगाबादचे डॉ. आर. जे. तोतला यांची निवड करण्यात आली. त्यांनी अध्यक्षपदाचा पदभार वरिष्ठ पेडियाट्रिक सर्जन डॉ. विवेक रेगे यांच्या हस्ते स्वीकारला.

यावेळी डॉ. पराग टापरे (अकोला), डॉ. मंजू सेलूकर (मुंबई), डॉ. विद्यानंद देशपांडे (औरंगाबाद), डॉ. जोत्स्ना कीर्तने (मुंबई), डॉ. प्रकाश अग्रवाल (चेन्नई), डॉ. रमेश बाबू (बेंगलोर), डॉ. मनिष पटेल (इंदौर), डॉ. रवी रेड्डी (लातूर), डॉ. अर्जुन पवार (औरंगाबाद) यांची उपस्थिती होती. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या कार्यकाळात बालरोगांबाबतच्या जनजागृतीसह विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला. डॉ तोतला हे मूळ गंगाखेड, जिल्हा परभणीचे आहेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु