कोलकातामधील डॉक्टर हल्ल्याचे राज्यात पडसाद, डॉक्टरांकडून निषेध

कोलकातामधील डॉक्टर हल्ल्याचे राज्यात पडसाद, डॉक्टरांकडून निषेध

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : कोलकात्यातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध सर्वत्र केला गेला. या हल्ल्यानंतर डॉक्टरांनी #savethedoctor अशी मोहीम सुरु केली आहे.या हल्ल्याचा महाराष्ट्रातील डॉक्टरांनीही निषेध केला. महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना आणि इंटर्न डॉक्टरांच्या संघटनेने हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत न्याय देण्याची मागणी केली. दोन्ही संघटनांनी प्रसिद्ध पत्रक काढून निषेध केला आहे.

कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार अपयशी ठरत आहे. सरकार जागतिक स्तरावर आरोग्य योजना बनवण्यात व्यस्त आहे, मात्र आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला.अकोल्यातही या घटनेचा मार्डने निषेध केला. सरकार आम्ही कायदा हातात घेऊ याची वाटत पाहत आहे का? असा सवाल मार्डने उपस्थित केला.

सुरक्षेसाठी सरकारला वारंवार पत्र लिहून आणि विनंती करून दुर्लक्ष होत आहे. आता आमचा संयम संपलेला असून आता कोणतीही पूर्वसूचना न देता कृती केली जाईल, असा इशारा मार्डच्या डॉक्टरांनी दिला.कोलकाता सरकार आणि पोलिसांनी या घटनेची चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी. याशिवाय देशातील सर्व राज्यांच्या सरकारने राज्यातील रुग्णालयांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी महाराष्ट्रातल्या इंटर्न डॉक्टरांनी केली आहे.

 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु