कॅन्सरच्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

कॅन्सरच्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मागील काही वर्षांपासून कॅन्सरने मृत्यू होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. ही वाढ अडीच पटीने झाल्याचे सांगण्यात येते. कॅन्सरचे हे प्रमाण पाहून काही कंपन्यांनी आणि व्यक्तींनी पैसे उकळण्यासाठी विविध प्रकारचे दावे करण्यास सुरूवात केली आहे. आमच्या औषधाने कॅन्सर बरा होतो असे म्हणून कॅन्सर रूग्णांची फसवणूक केली जात आहे. यामुळेच कॅन्सरने मरणारांची संख्या अडीचपटीने वाढली आहे. या प्रकारामुळे जगभरातील तज्ज्ञ चिंताग्रस्त झाले आहेत.

जगभरात कॅन्सर वेगाने वाढत असून संशोधक यावरील उपायांचा शोध घेत आहेत. तर काहीजण या गंभीर स्थितीचाही आर्थिक लाभ उठवण्यासाठी उपचाराचे दावे करत आहेत. सोशल मीडियावर अशाप्रकारच्या उपचारांचा जास्त प्रचार असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच कॅन्सरच्या रूग्णांच्या मृत्युच्या आकडेवारीत अडीच पटीने वाढ झाली आहे. या फसव्या पर्यायी उपचारांपासून दूर रहावे, असा इशारा देण्यात आला आहे. महिलांमध्ये सर्वात जास्त आढळणारा कॅन्सर हा ब्रेस्ट कॅन्सर आहे. जगभरात कॅन्सरसारखा आजार वेगाने वाढत आहे. शरीरात अनियंत्रित पेशींची वाढ झाल्याने होणारा हा आजार शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. याचा जागेवरूनच नावे ठरतात.

कॅन्सर बरा करण्याचा दावा करणाऱ्या मार्केटचे वाढणे हे धोकादायक ठरत आहे. या कॅन्सरच्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटशी मोठी लढाई करण्याची गरज आहे. हे मार्केट एवढे पसरले आहे की, लोक सहजपणे त्यामध्ये फसले जात आहेत. कीमोथेरपी वाईट आहे. याने व्यक्तीचे जीवन वाईटप्रकारे प्रभावित होते. पण हाच योग्य उपाय आहे. ८५ टक्के रूग्ण आहेत, ज्यांच्या कॅन्सरची योग्य वेळेवर माहिती मिळवली गेली होती. ते कीमोथेरपी आणि सर्जरीने बरे होऊ शकत होते. पण त्यांनी या उपचाराची निवड न करता पर्यायी चिकित्सेची निवड केली आणि त्यांचा मृत्यू झाला, असे अमेरिकी सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डेविड गोर्सकी यांनी म्हटले आहे. अ‍ॅक्यूपंचर, आहार परिवर्तन, इतर चिकित्सेमध्येही आतापर्यंत कॅन्सर शंभर टक्के बरा करणारा उपाय सापडलेला नाही. त्यामुळे कॅन्सरच्या नावावर चालू असलेल्या कोणत्याही उपचाराच्या जाळ्यात न अडकणेच रूग्णाच्या हिताचे आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु