तुमच्या मुलांना ऑनलाईन गेमिंगचे व्यसन लागलय का?,वेळीच सावध रहा

 
तुमच्या मुलांना ऑनलाईन गेमिंगचे व्यसन लागलय का?,वेळीच सावध रहा

हल्लीची  लहान मुलं मैदानात कमी आणि ओनलाईन गेम्स जास्त खेळताना दिसतात. अनेक मुलं तासनतास इंटरनेवरील गेम खेळण्यात मग्न असतात. अशांना इंटरनेट गेमिंग डिसॉर्डर असण्याची शक्यता असते. या डिसॉर्डरमध्ये एखादी व्यक्ती बराच वेळ इंटरनेटचे गेम खेळून त्याच्या आहारी जाते.
इंटरनेट गेंमिंगचं व्यसन लागलंय? ओळखण्यासाठी प्रश्नावली 

–जेव्हा तुम्हाला इंटरनेवरचे गेम खेळायला मिळत नाहीत तेव्हा तुमची चिडचिड होते का?–आधी खेळल्यामुळे मिळालेला आनंद पुन्हा मिळव्यासाठी तुम्ही अधिक काळ खेळता का?–स्वतःला खेळण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही अपयशी ठरताय का?–व्हिडियो गेम खेळल्याने तुमचा इतर गोष्टींमधील रस कमी झालाय का?–इंटरनेट गेम खेळण्याने होणाऱ्या दुष्परिणांबाबत माहिती असूनही तुम्ही गेम खेळता का?–किती वेळ इंटरनेट खेळता याबाबत इतरांना खोटं सांगता का?–ताण कमी करण्यासाठी तुम्ही इंटरनेट गेम खेळता का?–हे गेम खेळण्यासाठी तुम्ही कधी तुमचं महत्त्वाचं काम टाळलंय?–जर या प्रश्नांपैकी ५० टक्के उत्तर ही ‘हो’ असतील तर ही चिंतेची बाब आहे. असं असल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ज्या व्यक्ती सातत्याने इंटरनेवरील —- –गेम खेळतात त्या डोकेदुखी, डोळ्यात पाणी येणं, हातात क्रॅम्प येणं, झोप कमी लागणं अशा समस्या उद्भवतात.
अभ्यासावरून असं लक्षात आलंय की, काही इंटरनेट गेम्स हे मेमरी वाढवण्यासाठी तसंच एकाग्रता वाढवण्यासाठी गरजेचे असतात. मात्र काही विचित्र गेम्समुळे लहान मुलांवर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो.
असे गेम खेळल्यानंतर बरेच अपघात झाल्याच्या बातम्या पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही पुढे असे गेम खेळताना सावधान रहा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु