हे माहित आहे का? जोडीदाराचा हात पकडल्याने तणाव होतो कमी, ‘हे’ आहे ७ फायदे

हे माहित आहे का? जोडीदाराचा हात पकडल्याने तणाव होतो कमी, ‘हे’ आहे ७ फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सार्वजनिक ठिकाणी जोडीदाराचा हात पकडणे हा दिखावा होऊ शकत नाही. प्रेम व्यक्त करण्याच्या या पद्धतीमुळे नाते आणखीन घट्ट होते. यामुळे जोडीदाराला तुमच्या प्रेमाची जाणीव होईल. तसेच त्याला एकटे वाटणार नाही. यासाठी दोघांनी एकमेकांना वेळ देणे महत्वाचे ठरते. नाते टिकून राहण्यासाठी एकमेकांना वेळ देणे गरजेचे असते. जोडीदारासोबत ज्या-ज्या वेळेस बाहेर जाल तेव्हा त्याला तुमच्या प्रेमाची जाणीव होईल, असे व्यक्त व्हा. याचे विविध फायदे असून त्यांची माहिती जाणून घेवूयात.

हे आहेत फायदे

१. कामामुळे मानसिक ताण येत असतो. जोडीदाराला ताण येत असेल तर त्याला समजून घ्या. त्याला विश्वास वाटेल असे वागा. हात पकडणे, गळा भेट घेतल्याने शररिक आणि मानसिक थकवा कमी होतो.

२. एकमेकांचा हात हात घेवून चालण्याने नाते घट्ट होते. आयुष्याच्या एकाच मार्गावर असल्याची जाणीव होते. एकमेकांच्या भावना समजावून घेण्यास मदत होते.

३. पार्टनरचा हात पकडल्याने शरिरातून ऑक्सीटोसिन नावाचे हार्मोन बाहेर पडते. या हार्मोनमुळे नाते अधिक काळापर्यंत टिकून राहते.

४. ऑक्सीटोसिन हार्मोनमुळे आरोग्य चांगले राहते. ब्लड प्रेशर लेव्हल नियंत्रणात राहते. हृदयाशी संबंधीत आजारांपासून देखील रक्षण होते.

५. नात्यात डिवोशन व्यक्त करणे महत्त्वाचे असते. हे डिवोशन व्यक्त करण्याचा सर्वात प्रभावशाली उपाय म्हणजे एकमेकांचा हात पकडणे. यामुळे एकमेकांसोबत अधिक जोडले गेल्याची भावना निर्माण होते.

६. यामुळे जोडीदारात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. दोघांसाठी ही भावना अतिशय गरजेचे आहे. एखाद्या अडचणीच्यावेळी या भावनेचा उपयोग होतो.

७. पार्टनर हात पकडतो तेव्हा तो आनंदी असतो. हा आनंद सहवास मिळाल्याचा आणि आयुष्यभर सोबत जाण्याचा असतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु