चावण्यासाठी डास माणसांना कसे शोधतात, माहित आहे का ?

चावण्यासाठी डास माणसांना कसे शोधतात, माहित आहे का ?

आरोग्यनामा ऑनलाईन –डास माणसे अथवा इतर प्राण्यांपर्यंत कसे पोहोचतात, याचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही प्रयोग केले. या प्रयोगात असे आढळून आले की, कार्बनडाय ऑक्साइडचे अस्तित्व, गरमी, शरीराची दुर्गंधी याआधारे डास माणसांपर्यंत पोहोचतात.        डासांच्या अँटिनामध्ये एक रिसेप्टर असते, ज्याद्वारे माणसाच्या घामातून लिघणारे लॅक्टिक अ‍ॅसिड शोधले जाते. शास्त्रज्ञांनी लावलेल्या या शोधाचा अहवाल करंट बायलॉजी या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.

हा शोध लावण्यारे डॉ. डिझेनारो यांनी यामध्ये म्हटले आहे की, हा शोध लावण्यासाठी एका साधा प्रयोग करण्यात आला. माणसाच्या घामात लॅक्टिक अ‍ॅसिड असून ते डासांना आकर्षित करते, हा शोध अनेक दशकांपूर्वी लागला होता. पण डास याकडे कसे आकर्षित होतात, ही प्रक्रिया उलगडण्यात आली नव्हती.

आता या शोधानंतर अशा प्रकारचे आयआरएटए रिसेप्टर निष्क्रिय करणारी कीटकनाशके किंवा रसायने तयार केली जाऊ शकतात. मात्र, कार्बनडाय ऑक्साइड ओळखणाऱ्या रिसेप्टर्सचा शोध आणखी लागलेला नाही. हेदेखील आयआरएटए ग्रुपचेच रिसेप्टर्स असतील, पण त्यावर अजून संशोधक काम करत आहेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु