सातत्याने  ‘LED’च्या संपर्कात राहिल्यामुळे होणारे तोटे ; जाणून घ्या

सातत्याने  ‘LED’च्या संपर्कात राहिल्यामुळे होणारे तोटे ; जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – विद्युत दाब कमी  लागत असल्याने तसेच आकारानेही लहान असल्यामुळे एलईडी लायटिंगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मोबाईल्स, टीव्ही आणि लॅपटॉप्समध्येही आपल्या भोवताली अनेक प्रकारचे एलईडी लाईट्स  सतत असतात. आपल्यापैकी अनेक जण दररोज सरासरी 10-15 तास मोबाईल, टीव्ही व लॅपटॉप स्क्रीन्सवर व्यतीत करतो. या स्क्रीनमधून उत्सर्जित होणार्‍या एलईडी लाईटचा आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो. जाणून घ्या एलईडी लाईट्सचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम –

एलईडी लाईट्सचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम –

1) एलईडी लायटिंगचा निळा प्रकाश आपल्या रॅटिनाला धोका पोहोचवू शकत असल्यामुळे आपल्या झोपेचे नैसर्गिक चक्र बिघडू शकते.

2) दीर्घकाळ एलईडी लाईट्सच्या संपर्कात डोळे आल्यास रॅटिनातील उतींना धोका पोहोचू शकतो व त्यामुळे एज-रीलेटेड मॅक्युलर डिजनरेशन हा आजार होऊ शकतो.

3) स्क्रीन्स आणि मोबाईल फोन्समधील ब्ल्यू लाईट डोळ्यांसाठी धोकादायक असतो. यामुळे रॅटिनाच्या मॅक्युलर भागाला धोका पोहोचू शकतो.

4) मोबाईल मधल्या ब्लु लाईटमुळे व त्याचा डोळ्यावर होणाऱ्या परिणामामुळे झोपेचा, डोळ्यावभवतीच्या काळ्या वर्तुळांचा धोका उदभवू शकतो.

5) मानसिक आरोग्यावर आणि झोपेवर खूप घातक परिणाम होत असतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु