मुंबईत घरांमध्येच वाढत आहेत डेंग्यू, मलेरियाचे डास

मुंबईत घरांमध्येच वाढत आहेत डेंग्यू, मलेरियाचे डास

आरोग्यनामा ऑनलाईन – गेल्यावर्षी मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाने धुमाकुळ घातला होता. त्यामुळे यावर्षी मुंबई महापालिकेने आतापासून उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. पालिकेच्या कीटकनाशक विभागाद्वारे मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या शोधून काढण्यासाठी तीन महिने विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेत मुंबईकरांच्या घरातच डेंग्यू आणि मलेरियाचे डास आढळून आले. या मोहिमेत मुंबईतील चार लाख घरांची तपासणी केली. ६०६ ठिकाणी मलेरिया, ३,१०२ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या पावसाळ्यात सर्वत्र पाणी साचते या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. या कालावधीत डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. यावर खबरदारी म्हणून यंदा मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी डेंग्यूच्या अळ्या शोधून काढण्यासाठी जानेवारीतच विशेष मोहीम सुरू केली असून मोहिमेत चार लाख घरांची तपासणी करण्यात आली.

या तपासणीत ६०६ ठिकाणी मलेरिया, ३,१०२ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. डेंग्यू-मलेरिया उत्पन्न करणारी ठिकाणे आढळल्यास पालिकेकडून आधी नोटीस पाठवली जाते आहे. नोटिसीनंतरही खबरदारी न घेतल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. जानेवारीपासून आतापर्यंत ८,३२,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पाण्याच्या टाक्या, कारंजे, कुलिंग टॉवर, इमारत बांधकामे, मनीप्लँट्ससारखी शोभिवंत झाडे, घराजवळील कुंड्या, वातानुकूलन यंत्रे इत्यादी ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. पाण्याच्या टाकीत अधिक काळ पाणी न ठेवता ती नियमित स्वच्छ करावीत. घराबाहेर पाणी साचणार नाही याची काळजी घेतल्यास गंभीर आजार सहज टाळता येतील.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु