लिंबू कापून बेडरुममध्ये ठेवा आणि चमत्कार पाहा, दिवसभर अनुभवाल ताजेपणा

लिंबू कापून बेडरुममध्ये ठेवा आणि चमत्कार पाहा, दिवसभर अनुभवाल ताजेपणा

आरोग्यानामा ऑनलाईन टीम – ताजेपणाचा अनुभव घ्यायचा असल्यास तीन लिंबू कापून बेड जवळ ठेवावेत. नियमित हा उपाय केल्यास चांगला फरक दिसून येतो. लिंबूचा सुगंध खुप ताजा असतो आणि हे पावरफुल क्लीनिंग एजंटप्रमाणे काम करते. याच्या अन्य काही उपयोगांबाबत जाणून घेवूयात.

हे आहेत उपयोग

* बेडरूममध्ये लिंबू कापून ठेवल्यास रसायनयुक्त रूम फ्रेशनर वापरण्याची गरज नाही.

* बेडरूमध्ये लिंबू ठेवल्यास दमा, सर्दी, पडसे झालेल्या व्यक्तीला श्वास घ्यायल्या बरे वाटते. ताजेतवाने वाटेल.

* केसांच्या कलरला कंटाळला असाल तर तो काढून टाकण्यासाठी केसांना लिंबू लावा. यामुळे कलर फिका पडेल.

* सफरचंद कापून ठेवले तर फोडी काळवंडतात. यासाठी त्यावर लिंबू फिरवा. ताजे राहिल.

* बीटचा हाताला लागलेला रंग जात नसेल तर लिंबू लावा. ताबडतोब रंग जातो.

* मायक्रोव्हेवमध्ये एका बाऊलमध्ये पाणी ठेवा. त्यामध्ये लिंबाच्या स्लाइस टाका. मायक्रोव्हेव सुरू करून थोडी वाफ येऊ द्या. नंतर बंद करून आतून स्वच्छ करा.

* कपड्याला लोखंडी गंजाचे डाग लागले असतील तर लिंबू चोळून धुवून घ्या. डाग निघून जातील.

* बाथरूमधील आरसा, गाडीच्या काचा स्वच्छ करण्यासाठी लिंबूचा वापर करा.

* पांढरे कपडे पिवळे पडले असतील तर त्यांना लिंबू चोळून थोडावेळ लिंबूच्या पाण्यात ठेवून धुवून घ्या. पुन्हा चमकदार होतील.

* प्लास्टिक बॉटल, बरणी, लंचबॉक्स ऑयली होऊन दुर्गंधी येत असेल तर त्यामध्ये पाणी आणि लिंबू टाकून ठेवा. सकाळी धुवून घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु