धुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती

धुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपल्याकडे सिगारेटच्या किमती वाढवून आणि सिगारेटच्या पाकिटावर धोक्याची सुचना लिहिण्याची सक्ती करून लोकांना या व्यवसनापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. जनजागृती केली जाते. मात्र, यापाठीमागे सरकारची आणि संबंधित यंत्रणांची खरंच प्रामाणिक इच्छा असते का ? याबाबत संशयच दिसून येतो. परंतु, यासंदर्भात जपानमधील एका कंपनीनी घेतलेली भूमिक खरोखर कौतुकास्पद आहे. धुम्रपान सोडणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना ही कंपनी विविध सोयी आणि सवलती देते.

मियाला कंपनीची योजना
१.
जपानमध्येही धुम्रपान करणारांची संख्या खूपच मोठी आहे. येथील मियाला या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यासाठी एक नवी प्रोत्साहनपर योजना सुरू केली आहे. जे कर्मचारी धुम्रपान करीत नाहीत, त्यांना वर्षाला सहा अतिरिक्त सुट्या देण्यात येत आहेत.

२. कारण धुम्रपान करणारे धुम्रपानासाठी एकदा बाहेर पडले तरी त्यासाठी त्यात पंधरा मिनिटे वाया जातात. कामाच्या वेळेत पाच वेळेस ते धुम्रपानासाठी गेले तरी तासाभरापेक्षा जास्त काळ वाया जातो.

३. यासाठी मियाला कंपनीने धुम्रपान न करणाऱ्याना सुट्यांची सवलत देऊ केली. याचा ताबडतोब चांगला परिणाम झाला. धुम्रपान करणाऱ्या काही कर्मचाऱ्यानीही आम्हीही धुम्रपान सोडणार असल्याचे जाहीर केले.

४. या प्रयत्नांना आता जगभरात चालना मिळते आहे.

५. अशा योजनांमुळे धुम्रपानापासून दूर राहणाऱ्याची संख्या कमी होऊ शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु