‘हे’ चार पदार्थ खाल्ल्याने वाढतो तुमचा लठ्ठपणा

‘हे’ चार पदार्थ खाल्ल्याने वाढतो तुमचा लठ्ठपणा

आरोग्यनामा ऑनलाइन – वजन कमी व्हावे किंवा नियंत्रित रहावे म्हणून अनेकजण डाएट करतात. व्यायाम सुद्धा करतात. मात्र, कधी कधी एवढे करूनही वजन कमी होताना दिसत नाही. अशावेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे. यासाठी आहारातील काही पदार्थ वज्र्य करणे अथवा त्यांचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. मीठ, साखर, तांदूळ आणि मैदा हे ते चार पदार्थ होय.

मिठाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, एका दिवसात एक ग्रॅमहून अधिक मीठ सेवन केल्यास लठ्ठपणा वाढू शकतो. संतुलित प्रमाणापेक्षा अधिक मीठ खाणाऱ्यांचे वजन इतरांपेक्षा अधिक असते. पॅक्ड पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असल्याने असे पदार्थ सतत खाल्ल्यास वजन वाढते. त्याचप्रमाणे साखरेमुळे लठ्ठपणा जलद गतीने वाढतो. अशा प्रकारे लठ्ठपणा वाढल्यास नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसते. दररोज आहारात साखरेचे प्रमाण कमी करून वजन कमी करता येऊ शकते. आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर पुरुषांनी दररोज ५० ग्रॅम आणि महिलांनी ७० ग्रॅमहून अधिक साखरेचे सेवन करू नये, असे तज्ज्ञ सांगतात.

तसेच तांदूळामुळेही लठ्ठपणा वाढतो. तांदळात कार्बोहायडड्ढेटचे प्रमाण अधिक असल्याने लठ्ठपणा वाढतो. वजन कमी करण्याची इच्छा असल्यास पांढऱ्याऐवजी ब्राऊन राइसचे सेवन करावे. मैदा आणि मैद्याने तयार खाद्य पदार्थांचे सेवन केल्यानेही लठ्ठपणा वाढतो. मैद्यापसून बनविलेले पदार्थ तुम्ही नेहमी खात असल्यास लठ्ठपणा कधीच कमी होणार नाही. मैद्यामुळे शरीरात ब्लड शुगर वेगाने वाढते. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु