स्वच्छतेची अतिकाळजी घेतली तर बाळात आढळू शकतात जन्मजात दोष

स्वच्छतेची अतिकाळजी घेतली तर बाळात आढळू शकतात जन्मजात दोष

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्वच्छतेची अतिकाळजी घेणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. काही गृहिणी तर सतत स्वच्छतेच्या मागे असतात. काही विकार होऊ नयेत, यासाठी दक्षता आवश्यक असली तरी याचा अतिरेक गंभीर असू शकतो. कारण अशा अतिस्वच्छेतेमुळे होणाऱ्या बाळावर परिणाम होऊ शकतो. बाळात जन्मजात दोष असू शकतात, असे शास्त्रज्ञांनी केलेल्या एका प्रयोगात आढळून आले आहे.

हे आहेत धोके
१.
शाम्पू, कंडिशनर्स, डिटर्जन्ट्स, पर्सनल हायजिन, कीटकनाशकांसाठी वेगवेगळे क्लिनर्स, हॅँड वॉश, फूड प्रिझरवेटिव्हज, लॉँड्री प्रॉडक्ट्स, आय ड्रॉप्स, याशिवाय इतरही अनेक पर्सनल केअर प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो. स्विमिंग पूलमध्ये अनेक स्वच्छतेसाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो.

२. स्वच्छतेसाठी वापरले जाणारे पदार्थ शरीरात जाणे किंवा त्याचे सेवन करणे, धोकादायक आहेत, शिवाय या पदार्थांच्या नुसत्या संपर्कानेही पुढच्या पिढीत जन्मजात दोष दिसू शकतात.

३. केमिकल डिटर्जन्ट्सच्या संपर्कामुळे जे दुष्परिणाम शास्त्रज्ञांना उंदरांवर दिसून आले, तसेच परिणाम माणसावरही होऊ शकतात. माणसं या पदार्थांच्या जास्त संपर्कात असतात.

४. घराची आणि वैयक्तिक स्वच्छता ठेवलीच पाहिजे. परंतु त्याचा अतिरेक नसावा. केमिकल्स आणि डिटर्जन्ट्सचा अतिरेकी वापर टाळला पाहिजे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु