सावधान ! आईस्क्रीम मध्ये वापरले जाते वनस्पती तेल

सावधान ! आईस्क्रीम मध्ये वापरले जाते वनस्पती तेल

आरोग्यनामा ऑनलाइन – उन्हाळ्यात आईस्क्रिमची मागणी वाढत असल्याने काही कंपन्या दुधाऐवजी वनस्पती तेलाचा वापर करून बनवतात. आणि हेच आईस्क्रिम आपण चवीने खात असतो. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मानांकनानुसार, आईस्क्रिम हे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा वापर करून तयार केले जाते. जर वनस्पती तेल, आर्टिफिशिअल स्वीटनरचा वापर केला जात असेल, तर ते आईस्क्रिम नसून फ्रोजन डिजेर्ट आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील वडाळा परिसरात वनस्पती तेलापासून बनवलेले आईस्क्रिम राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (एफडीए) जप्त केले आहे. तब्बल २७ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. आईस्क्रीमच्या नावाखाली फ्रोजन डिजेर्टची विक्री बाजारात केली जाते. एफडीएने साईनाथ इंड. भारत इंड. इस्टेट या कंपन्यांवर छापे टाकून नामांकित कंपन्यांची आईस्क्रिम तयार करताना वनस्पती तेलाचा करताना रंगेहात पकडले. एफडीएने तब्बल २७,५८६ रुपयांचा आईस्क्रीमचा साठा जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारचे आईस्क्रिम आरोग्यासाठी अपायकार असून विश्वासार्ह ठिकाणीच आईस्क्रिम खरेदी केली पाहिजे किंवा आईस्क्रिम खाणे टाळले पाहिजे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु