सावधान ! खाद्यपदार्थ ऑनलाईन ऑर्डर करताय.. !

सावधान ! खाद्यपदार्थ ऑनलाईन ऑर्डर करताय.. !

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्याला अनेकदा हॉटेलमध्ये जेवण करायचा मूड होतो. परंतु, आपल्याला हॉटेलमध्ये जायचा कंटाळा येतो. आणि मग आपण ऑनलाईन सर्च करून आपल्या आवडीचा पदार्थ ऑनलाईन ऑर्डर करतो. परंतु , हे खाद्यपदार्थ काही नामांकित कंपन्या परवाना नसलेल्या आस्थापनांमधून पुरवत असल्याने हे खाद्यपदार्थ अतिशय स्वच्छ असतात. त्यामुळे हे पदार्थ खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोक्याचे आहे. अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली.

हे पदार्थ आपल्याला घर बसल्या मिळतात. त्यामुळे आपण हे पदार्थ खरेदी करताना कोणताही विचार करत नाही. आणि आपलं आरोग्य धोक्यात टाकतो. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ साली मुंबईतील एकूण ३६६ आस्थापनांची तपासणी केली. १२२ आस्थापनांचे व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. २०१८ साली प्रशासनाने काही कंपन्यांची तपासणी केली. तेव्हा या कंपन्यांनी कायद्याचे उल्लंघन केले. असे निदर्शनात आले होते.या पार्श्वभूमीवर या कंपन्यावर काय कारवाई केली. असा सवाल विधानसभेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना रावल बोलत होते. अन्न आणि औषध प्रशासनाने २०१८ मध्ये मुंबईत ३६६ आस्थापनांची तपासणी केली. व १२२ आस्थापनांवर व्यवसाय बंद करण्याची कारवाई केली होती.

आणि विशेष म्हणजे पुण्यातील दोन विनापरवाना आस्थापनांकडून अन्न पदार्थ खरेदी केल्याप्रकरणी स्विगी आणि झोमॅटोविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.दरम्यान या प्रकरणात १९ छोट्या अन्न व्यावसायिकांविरोधात तडजोड प्रकरणं दाखल करून १,५१,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. स्वीगी या कंपनीविरोधात ५९ न्यायनिर्णय प्रकरणं आणि झोमॅटो या कंपनीविरोधात २६ न्यायनिर्णय प्रकरणी दंडात्मक कारवाईसाठी दाखल करण्यात आली. तसेच मुंबईतील झोमॅटो मीडिया या आस्थापनाविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती रावल यांनी दिली.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु