सावधान ! आजारावर ‘ऑनलाइन उपचार’ शोधताय ? ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा

सावधान ! आजारावर ‘ऑनलाइन उपचार’ शोधताय ? ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रत्येक समस्येचे आणि प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न गुगलवर करण्याची सवयच अनेकांना जडली आहे. कोणतीही समस्या असो, गुगल सर्च करा, असा सल्ला एकमेकांना दिला जातो. गुगलवर सर्च केल्यावर जे काही उत्तर मिळते ते बरोबरच आहे, असे अनेकांना वाटते. काहीजण तर विविध आजारांवरील उपचारसुद्धा गुगलवर शोधतात. हे तर अतिशय धोकादायक ठरू शकते. गुगल डॉक्टर बनण्याचा हा विचार मनातून काढून टाका आणि आरोग्यविषयक कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांकडे जा. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

हे लक्षात ठेवा

१. डॉक्टरांनी सांगितलेल्या टेस्टची सर्व माहिती गुगलवर टाकून स्वतःला काय झाले आहे याचे निदान करण्याचा प्रयत्न करू नका.

२. कोणत्याही आजाराचे निदान करणे हे डॉक्टरांचे काम आहे.

३. आजाराचे निदान स्वताच करणे आणि उपचारही ऑनलाइन शोधणे हे घातक आहे.

४. गुगलवरील माहिती जाणून स्वत: टेन्शन घेऊ नका आणि डॉक्टरांनाही प्रश्न विचारुन भंडावून सोडू नका.

५. अनेक महाभाग तर डॉक्टर जे औषध देतात त्यांचे साइड इफेक्ट्स कोणते याची माहिती गुगलवरुन घेऊन त्याविषयी डॉक्टरांनाच प्रश्न विचारतात.

६. तर काहीजण गुगलवरील माहिती घेऊन इतरांना फुकट सल्ले देतात.

७. गुगल डॉक्टर होऊन स्वत:वर उपचार करू नका आणि कुणाला सल्लेही देऊ नका. करण धोक्याचे ठरू शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु