सावधान ! ‘हे’ पाणी पिणे आहे तुमच्या आरोग्याला हानिकारक

सावधान ! ‘हे’ पाणी पिणे आहे तुमच्या आरोग्याला हानिकारक

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – प्लास्टिक आरोग्य आणि पर्यावरणासाठी हानिकारक असते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, आज तरी प्लास्टिकला पर्याय नाही. प्लास्टिकच्या पिशव्या, भांडी आणि अन्य विविध प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू आपण रोजच वापरतो. त्यातही पाण्याच्या बाटल्या प्रामुख्याने प्लास्टिकच्याच असतात. मात्र, या प्लास्टिकच्या बाटल्या आरोग्याला हानीकारक ठरू शकतात. पाण्याच्या बाटलीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकची गुणवत्ता चांगली नसल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

विकत मिळणाऱ्या प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी आरोग्यासाठी जास्त हानिकारक असते. या बाटल्या हलक्या दर्जाच्या असतात. प्लास्टिकची बाटली सूर्यप्रकाश, उष्णता, ऑक्सिजन वा उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यास त्यातून विषारी द्रव्ये बाहेर पडतात. ही द्रव्ये पाण्यात मिसळच असल्याने हे पाणी पिणे चांगले नसते. अनेकदा प्लास्टिक बाटल्या पॉलीथिलीन आणि पॉलीप्रॉपिलीनपासून तयार केलेल्या असतात. मात्र, यामध्ये थंड पाणी साठवून ठेवले आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं तरच त्या वापरणे सुरक्षित आहे. मिनरल वॉटरची बाटली तुम्ही विकत घेतल्यावर ती बाटली पुन्हा वापरु नये. आपली नियमीत पाण्याची बाटलीही वेळोवेळी स्वच्छ करत राहावी.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु