बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांच्या जीवितास धोका, आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष

बोगस डॉक्टरांमुळे रुग्णांच्या जीवितास धोका, आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष

आरोग्यनामा ऑनलाईन – सरकारी आरोग्य यंत्रणेवरील विश्वास नागरिकांच्या मनात अद्यापी दृढ झाला नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक खासगी रुग्णालयाची वाट धरतात. यामध्ये मात्र बोगस डॉक्टरांची कमाई होते. परंतु अपुरे ज्ञान आणि उपचाराअभावी रुग्णांचा जीव जाण्यास वेळ लागत नाही. अशा बोगस डॉक्टरांची संख्या मौदा तालुक्यात उदंड झाल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

काहींनी डॉक्टरांकडे शिक्षण घेऊन आता स्वत:चे क्लिनिक स्थापन केल्याचे चित्र आहे. त्यांनी बाहेरच्या राज्यातून डॉक्टरची पदविका घेतली आहे. ताप, खोकला, सर्दी झाले की, हे डॉक्टर महागडे औषधी लिहून देतात. थोड्या आजारावर सलाइन लावण्याचा सल्ला देतात. पाचशे रुपयांचे बिल एकाच वेळी बनविले जाते. सलाइनची किंमत ३० रुपये आहे.परंतु बोगस डॉक्टर बिल अधिक काढत असल्याने गोरखधंदा कधी थांबणार, हा प्रश्न नागरिक विचारताहेत.

मौदा तालुक्यात पूर्वीच उच्चशिक्षित डॉक्टरांची उणीव आहे. गंभीर स्थितीत एखाद्या रुग्णाला भरती करायचे झाल्यास हात लावायला तयार होत नाही. नागपूरला रेफर करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र रुग्णालयात चोवीस तास आरोग्यसेवेचे बोर्ड लागले असतात. मध्यरात्री रुग्णाला सरकारी रुग्णालयात भरती केल्यास काहीही सुविधा उपलब्ध होत नाही. परिस्थितीवर मात करीत गरीब व्यक्ती बोगस डॉक्टरकडे उपचार करून आर्थिक भुर्दंड सहन करतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु