‘वॉशरूम’ आणि ‘टॉयलेट’मध्ये चुकूनही करू नका ‘या’ ९ चुका, अशी घ्या काळजी

‘वॉशरूम’ आणि ‘टॉयलेट’मध्ये चुकूनही करू नका ‘या’ ९ चुका, अशी घ्या काळजी

आरोग्यनामा ऑनसलाइन टीम – वॉशरूम आणि टॉयलेटमध्ये डोळ्यांना न दिसणारे हानिकारक बॅक्टेरिया असतात. ते शरीरात जाऊन तुमचे आरोग्य बिघडवू शकतात. यासाठी विशेषकरून पब्लिक वॉशरूममध्ये जास्त काळजी घ्यावी. शिवाय, घर आणि ऑफिसच्या वॉशरुममध्येही काळजी घेतली पाहिजे. वॉशरूम वापरताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या चुका करू नयेत, याविषयी जाणून घेवूयात.

अशी घ्या काळजी
१.
टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसल्याने ज्वॉईंट, स्पाइन आणि हडांशीसंबंधीत त्रास होऊ शकतो.

२. वॉशरूममधून बाहेर आल्यावर हात स्वच्छ धुवावेत. अन्यथा अनेक आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

३. हँड ड्रायरमध्ये पेपर टॉवलच्या तुलनेत २७ टक्के जास्त बॅक्टेरिया असतात. त्यामुळे त्याचा वापर कमीच करा, असे युकेच्या लीड्स युनिव्हर्सिटीच्या संशोधनात सांगण्यात आले आहे.

४. टॉयलेटमध्ये बसून चिंतन करू नका. कारण जास्त वेळ बसल्याने निगेटिव्ह विचार मनात येतात. यामुळे डिप्रेशन आणि ताणतणावाची समस्या वाढू शकते.

५. वॉशरूमधील साबणातही बॅक्टेरिया असू शकतात. यामुळे विविध आजार होऊ शकतात. यासाठी पॅक्ड लिक्विडचा वापर करावा.

६. वॉशरूममध्ये जास्त वेळ थांबल्यास बॅक्टेरियामुळे यूरीन इन्फेक्शन होऊ शकते.

७. टॉयलेटमध्ये बुक्स, वॄत्तपत्र वाचल्याने त्यावर बॅक्टेरिया चिकटतात. ज्यामुळे वेगवेगळे रोग पसरतात.

८. वॉशरूम किंवा टॉयलेटमधील हानिकारक बॅक्टेरिया मोबाईलवर चिकटतात. असा मोबाईल वापरल्याने आरोग्य धोक्यात येऊ शकते.

९. वॉशरूममधील सीट आणि आरशावर लाखोंच्या संख्येने बॅक्टेरिया असतात. यामुळे अस्थमासह कॅन्सरसारखे आजारही होऊ शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु