रूग्णांना सुरक्षित रक्त मिळतेय का ? आधुनिक तपासणी गरजेची

रूग्णांना सुरक्षित रक्त मिळतेय का ? आधुनिक तपासणी गरजेची

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – राज्यात २०१८-१९ मध्ये रक्त संक्रमणामुळे १३ टक्के रूग्णांना एचआयव्ही इन्फेक्शन झाले असल्याचे उघड झाले आहे. तसे नॅकोच्या अहवालात म्हटले आहे. ही धक्कादायक परिस्थिती पाहता रूग्णांपर्यंत सुरक्षित रक्त पोहोचणे गरजेचे आहे. रूग्णांपर्यंत सुरक्षित रक्त पोहोचणे गरजेचे असल्याने पुण्यातील जनकल्याण ब्लड बँकेमार्फत एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्ताची तपासणी करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

१४ जून हा जागतिक रक्तदाता दिन आहे. रक्तदानासाठी लोकांना प्रोत्साहन देणे, रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे. रक्तदान करताना सुरक्षित प्रक्रियांचा वापर तसेच रक्तसंक्रमणामुळे इन्फेक्शन होऊ नये यासाठी रक्ततपासणी तंत्रज्ञानावर भर देणे हा या दिनामागील हेतू असतो. रक्ततपासणी करण्याच्या आधुनिक पद्धतीची भारतीय लोकांना गरज आहे. संपूर्ण जगभरात २० टक्के देशांमध्ये आधुनिक रक्त तपासण्याची पद्धत वापरली जाते. या आधुनिक तपासणीच्या माध्यमातून सुरक्षित रक्त पुरवठा होते.

जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून रूग्णांपर्यंत सुरक्षित रक्त पोहोचणे किती गरजेचे आहे यासाठी पुण्यातील जनकल्याण ब्लड बँकेमार्फत परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत रक्तसक्रमणामुळे इन्फेक्शन झाल्याने त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आरोग्य सेवेवर किती परिणाम होतो याबाबत जागरूकता होण्याची गरज, यावर उपस्थितांनी चर्चा केली. या परिषदेत रक्ताची तपासणी करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात यावा यावर चर्चा करण्यात आली.आपत्कालीन परिस्थितीत रक्त संक्रमण हे फार आवश्यक आहे. आपात्कालीन परिस्थितीत पुरेसा रक्तपुरवठा करण्यासाठी योग्य पद्धतीची रक्तसंक्रमण सुविधा असली पाहिजे. आतापर्यंत जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तसंक्रमणामुळे इन्फेक्शन झालेल्या १११ रूग्णांना वाचवण्यात यश आले आहे. रक्ततपासणी करणाऱ्या अत्याधुनिक पद्धतीमुळे जीव वाचवणे शक्य झाले आहे, असे जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु