गॅस्ट्रोबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, १२० रुग्ण बाधित

गॅस्ट्रोबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ, १२० रुग्ण बाधित

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चंद्रपुरातील ओवाळा येथे गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाची एक चमू गावात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन आता १०० ते १२० वर पोहोचली आहे.

ओवाळा गावात एका सार्वजनिक विहिरीचे पाणी पिल्याने गावातील सुमारे शंभर ते १२० जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. ६० ते ७० जणांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी २० रुग्ण तळोधी बा. प्राथमिक आरोग्य केंद्रात तर १३ रुग्ण नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. सुमारे ६० ते ६५ रुग्णांना पुन्हा गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती देण्यात आली. त्यातील बरेचसे रुग्ण तळोधी (बा.) येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. ओवाळा येथे पिण्याच्या पाण्यासाठी एकच स्त्रोत असल्याने गावातील नागरिक याच विहिरीचे पाणी पितात. मात्र, पाणी कशामुळे दूषित झाले हे तपासणीअंती कळेल. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे.

जि. प. सदस्य गजपुरे यांनी ओवाळा गावाला भेट देऊन ओवाळा येथील सरपंच प्रेमीला तोरे, ग्रामसेवक ए. एम. आदे, डॉ. राजेश ताडमवार यांच्याशी चर्चा केली व गावात दवंडी फिरविण्याचे आदेश दिले. तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार सुरू असून, दोन ते तीन रुग्णांना जास्त त्रास असल्याने त्यांना नागभीड येथे हलविण्यात आले असल्याचे सांगितले. या सर्व परिस्थितीवर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी हे लक्ष ठेवून आहेत. आरोग्य विभागाकडून गावात सर्व्हे करण्यात येत आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु