नेहमी साडी परिधान करता ! मग ‘हा’ इशारा तुमच्यासाठीच

नेहमी साडी परिधान करता ! मग ‘हा’ इशारा तुमच्यासाठीच

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नेहमी साडी परिधान करणाऱ्या महिलांना कर्करोग होऊ शकतो. साडीसोबत वापरल्या जाणाऱ्या पेटीकोटच्या नाडीने कमरेवर गाठ तयार होते आणि ही गाठ कर्करोगाची असू शकते, अशी धक्कादायक माहिती काही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे. नेहमी साडी परिधान करणाऱ्या महिलांसाठी हा इशारा म्हणजे धोक्याची घंटा आहे.

डॉक्टरांच्या एका पथकाने याविषयी संशोधन केले. या संशोधकांनी एका ४० वर्षांच्या महिलेचा अभ्यास केला. ही महिला साडी परिधान करताना पेटीकोटचा नाडा कमरेवर अतिशय घट्ट बांधत होती. काही काळानंतर तिच्या कमरेवर काळे व्रण दिसत होते. त्या जागी महिलेला प्रचंड वेदनाही होत होत्या. परंतु दुखण्याकडे तिने दूर्लक्ष केले. कालांतराने कमरेवर गाठी तयार झाल्या. त्या गाठींची तपासणी केली असता त्या कर्करोगाच्या असल्याचे आढळले. हे संशोधन करणारे डॉक्टर म्हणाले की, भविष्यात होर्णाया गंभीर आजाराविषयी माहिती नसल्याने महिला पेटीकोटीचा नाडा जास्त आवळून बांधतात. अशा महिलांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. महिलांनी पेटिकोटसाठी जाड नाड्याचा वापर करावा. तसेच नाडा बांधण्याची जागा दररोज बदलली पाहिजे, असा सल्ला या संशोधकांनी दिला आहे.

अभ्यासकांनी कर्करोगावरील प्राथमिक उपचारासाठी एक नवी लस तयार केली असून ही लस कर्करोग नियंत्रणात आणू शकते, असाही दावा या पथकाने केला आहे. कर्करोग रुग्णांवर उपचार करताना ही लस रोग प्रतिकारक शक्तीवर देखील प्रभावशाली ठरू शकते. ही लस कर्करोग पसरवर्णाया गाठी नष्ट करते, अशी अमेरिकेच्या ऑनलाईन कॅन्सर जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली होती.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु