पुण्यातील ७२ वर्षांच्या आजीने किडनी दान करून वाचवले ‘त्याचे’ प्राण

पुण्यातील ७२ वर्षांच्या आजीने किडनी दान करून वाचवले ‘त्याचे’ प्राण

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पुण्यातील एका ७२ वर्षांच्या आजीचा १२ वर्षांचा नातू किडनीच्या आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर किडनीच्या ४ ते ५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. नंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने अखेर या मुलावर ही शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. मात्र, किडनीदाता तातडीने उपलब्ध नसल्याने या मुलाच्या आजीने स्वत:ची किडनी दान केली आणि नातवाचे प्राण वाचवले. आजी आणि नातवाचे नातं किती एकरूप असते हेच या घटनेवरून दिसून आले आहे.

या १२ वर्षांच्या मुलाचे नाव साहिल भुंडेरे असून जन्मापासूनच त्यास किडनीची गंभीर समस्या होती. या मुलाची आजी पुण्यात राहते. साहिल नवजात असताना त्याची किडनी खराब झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले होते. किडनीचा आजार असल्याने गेल्या सहा वर्षांपासून तो डायलिसिसवर होता. या वर्षांमध्ये त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या. पण अखेर डॉक्टरांनी त्याला किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता.

यावेळी नातवाला वाचविण्यासाठी त्याच्या आजीने किडनी देण्याचा निर्णय घेतला. यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. साडेतीन ते चार तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. ही शस्त्रक्रिया डॉ. दीपक किरपेकर, डॉ. योगेश सोहोनी, डॉ. नितीन गाडगीळ, डॉ. पै, डॉ. धनेश करमरकर, डॉ. नुपूर बिस्च, डॉ. अर्चना जन आणि डॉ. कान्हे यांनी मिळून यशस्वी केली. आता दोघांचीही प्रकृती उत्तम असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. साहिलचे वडील संतोष भुंडेरे हे कॉन्स्टेबल आहेत. ते म्हणाले, आम्ही साहिलला आयुष्यभर डायलिसिसवर ठेऊ शकत नव्हतो. नशीबाने आईची किडनी त्याच्यासाठी मॅच झाली.

तर साहिलवर उपचार करणारे नेफ्रोलॉजीस्ट डॉ. मनोज माटपानी म्हणाले, किडनीदान करणारी साहिलची आजी ७२ वर्षांची आहे. मात्र त्यांचे आरोग्य उत्तम आहे. त्यांना मधुमेह किंवा हृदयासंदरभातील कोणताही आजार नाही. अवयवदानासाठी दात्याचे वय शक्यतो ६०-६५ असते. हे कुटुंब कल्याणला राहाणारे आहे. पुण्यातील रूग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रथम शस्त्रक्रिया करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, नंतर किडनी प्रत्यारोपणाचा निर्णय घ्यावा लागला.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु