‘केळी’ संदर्भातील ‘या’ गोष्टी वाचून तुम्ही सुद्धा व्हाल चकित !

 
‘केळी’ संदर्भातील ‘या’ गोष्टी वाचून तुम्ही सुद्धा व्हाल चकित !

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतात केळी मोठ्याप्रमाणात खाल्ली जातात. त्यामुळे सर्वाधिक विकले जाणारे फळ केळी आहे. स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असणारी केळी हे गरीबांचे फळ म्हणून प्रसिद्ध आहे. हे फळ दहा हजार वर्षांपासून खाल्ले जात आहे. केळ पौष्टिक आणि तंतुयुक्त असलेले गोड फळ आहे. केळामध्ये विविध औषधी गुण भरपूर प्रमाणात असतात.

कच्च्या केळामध्ये स्टार्च व सेल्युलोज भरपूर असते. केळ पिकले, की या स्टार्चचे रूपांतर सुक्रोज, फ्रुक्टोज व ग्लुकोज या साध्या रेणूंच्या कार्बोहायड्रेट्समध्ये होते म्हणून कच्चे केळ बद्धकोष्ठतेवर व पिकलेले केळे जुलाबावर गुणकारी आहे. मधुमेहींसाठी केळ नक्कीच उपयुक्त ठरते. केळीमधील सुक्रोस, फ्रुक्टोस, ग्लुकोज या नॅचरल शुगरमुळे तसेच काबोर्हायड्रेटमुळे शरीराला त्वरीत उर्जा मिळते. म्हणून खेळाडूंना स्टॅमिना आणि रूग्णांना प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी केळी दिली जातात.

केळ्यातील ट्रायप्टोफन नावाच्या प्रोटीनमुळे मानसिक ताण कमी होतो. सतत कामाचा ताण असल्यास आहारात केळी खावीत. केळ पुरुषांसाठी शक्तिवर्धक आहे. केळ खाल्याने शुक्राणूंची संख्या वाढते. त्यामुळे दररोज एक केळ खावे. पूर्ण पिकलेल्या केळामध्ये अ‍ॅन्टीफंगल आणि अ‍ॅन्टीबायोटिक गुणधर्म असतात. केळ हे पॉटॅशिअमचा चांगला स्रोत व सोडियमचे प्रमाण कमी असलेले फळ असल्याने याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच तोंड येण्यावरही केळे उपयोगी आहे.

विविध रासायनिक आणि कृत्रिम औषधे म्हणजेच एस्परिन, इण्डोमेथासिन, सिस्टियामाइन, हिस्टामाइन यांचे सेवन केल्यानंतर अनेकांचे तोंड येते, तोंडात व्रण पडतात. कच्चे केळ वाळवून त्याचे चूर्ण तयार करून ठेवावे. या चूर्णाच्या सेवनाने तोंड येत नाही, असे संशोधनात आढळून आले आहे.

विविध संशोधनातून ही माहिती समोर आली आहे की, केळाची  साल टेस्टोस्टेरोनला सक्रिय होऊ देत नाही. केळाची साल प्रोस्टेट ग्रंथीची वृद्धी रोखण्यात सक्षम आहे. केळ्यामध्ये व्हायरस नियंत्रित करण्याचे जबरदस्त गुण आहेत. एकआरएसए आणि एचआयव्हीबीएम नियंत्रित ठेवण्यासाठी केळी उपयोगी असल्याचे विविध संशोधनातून समोर आले आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु