कोलेस्ट्रॉल आणि बीपी कमी करण्यासाठी अवश्य घ्यावा ‘हा’ चहा

कोलेस्ट्रॉल आणि बीपी कमी करण्यासाठी अवश्य घ्यावा ‘हा’ चहा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चहामुळे शरीराला उर्जा आणि ताजेपणा मिळतो. चहातील कॅफीन हे मुत्रवर्धक असून नाडी तंत्राची उत्तेजना यामुळे वाढवते. मांसपेशीला बळ मिळते. चहा विविध आयुर्वेदिक पद्धतीने घेता येतो. एक कप चहाच्या पाण्यामध्ये दोन ग्रॅम मध आणि तीन ग्रॅम दालचिनीची टाकून हा चहा दिवसातून तीन वेळेस प्यायल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते.

हे उपाय करा

* रक्तदाब नियंत्रात ठेवण्यासाठी अर्जुन वृक्षाच्या सालीचे ४ ग्रॅम चूर्ण चहामध्ये टाकून घेऊ शकता. या उपायाने उच्च रक्तदाब सामान्य होतो.

* त्वचा किंवा शरीरावरील एखादा भाग भाजल्यास चहाची पाने उकळून ते पाणी कापूस किंवा सुती कपड्याने भाजलेल्या ठिकाणी लावावी.

* चहाची पाने लोण्यामध्ये मिसळून हे मिश्रण मुळव्याधीच्या रुग्णाने जखमेवर लावल्यास लवकर आराम मिळेल. दिवसातून २-३ वेळेस हा उपाय करावा.

* जर सर्दी, डोकेदुखी असेल तर अद्रक टाकलेला चहा घेल्यास आराम मिळेल.

* खोकला दूर कण्यासाठी चहामध्ये अर्धा चमचा गुळवेल चूर्ण टाकून, हा चहा दररोज सकाळी घेतल्यास लवकर आराम मिळेल. हा उपाय नियमितपणे तीन महिने केल्यास खोकला पूर्णपणे बरा होईल.

* चहाच्या पाण्यामध्ये तळवे बुडवून ठेवल्यास तळवे नरम होतात, तसेच एखादे इन्फेक्शन झाले असेल तर तेही दूर होते.

* रक्ताची कमतरत असेल तर अनंतमूळ, दालचिनी आणि बडीशेप समान प्रमाणत चहामध्ये टाकून घ्यावी. दिवसातून कमीतकमी एकदा असा चहा घ्यावा. या उपायाने रक्त शुद्ध होईल तसेच रक्त तयार होण्याची प्रक्रिया गतीने होईल.

* चहामुळे घाम आणि लघवी जास्त प्रमाणात येते. शरीरातील डिटॉक्सिंग प्रक्रिया दुरुस्त करण्यासाठी चहा एक उत्तम उपाय आहे.

* खूप वेळ उकळलेला चहा प्यायल्यास लठ्ठपणा कमी होतो. वैज्ञानिक तथ्यही हेच सांगते की, बराच वेळ उकळलेल्या चहामधून टॅनिन रसायन निघते. हे रसायन पोटाच्या आतील भागावर जमा होऊन भूक नष्ट करते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु