‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेने तुम्ही जाऊ शकता डिप्रेशनमध्ये, जाणून घ्या

‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेने तुम्ही जाऊ शकता डिप्रेशनमध्ये, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चूकीच्या जीवनशैलीमुळे अलिकडे लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब आणि डिप्रेशन या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. यापैकी डिप्रेशनचे प्रमाण सुद्धा गंभीर आहे. अनेक भारतीयांना या आजाराने ग्रासले असून यामागे विविध कारणे आहेत. डिप्रेशनमध्ये व्यक्ती असताना शारीरिक व्याधी निर्माण झाल्यास तो आणखी खचतो. त्याचा आत्मविश्वास नष्ट होतो. डिप्रेशनची लक्षणे आणि कारणे यांची माहिती आपण घेणार आहोत.

ही आहेत लक्षणे

* जास्त गारवा नसतानाही थंडी वाजणे, हात-पाय थरथर कापणे.

* जरा गार हवा लागली तरी आजारी पडणे.

* चालताना धापा टाकणे, जिना चढताना श्वास भरुन येणे, लगेच थकणे, उत्साह नसणे.

* सारखी सर्दी-खोकला होणे, शंभर टक्के देण्यात कमी पडणे आदी सिम्पटम्स आहेत.

हे आहे कारण

व्हिटॅमिनचे बी-१२ हे मेंदू आणि तंत्रिका तंत्र यांचे सुयोग्य काम करते. कोशिकांची जडणघडण, ब्रेन-स्पायनल कॉड, नसा यांचे आरोग्य चांगले राखते. तसेच शरीराच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळे प्रोटीन पुरवण्याचे कामसुद्धा करते. हे शरीरातील सर्वांत महत्त्वपूर्ण व्हिटॅमिन आहे. जन्माच्या वेळच्या विकृती रोखण्यातही या व्हिटॅमिनचे योगदान मोठे आहे. त्यामुळे गर्भधारणेचे प्लॅनिंग करताना महिलेने या व्हिटॅमिनच्या प्रमाणाकडे लक्ष देणे गरजेचे असते.

अत्यंत आवश्यक व्हिटॅमिन
निरोगी जीवन जगण्यासाठी व्हिटॅमिनचे बी-१२ ची शरीरातील आवश्यक उपस्थिती अत्यंत आवश्यक असते. याची कमतरता जाणवली तर लगेच व्याधी जडतात. अ‍ॅनिमेयाची कारणे, उगम आणि उपचार यांचा शोध घेताना या व्हिटॅमिनचा शोध लागला होता.

मनसिक आजार वाढतात
शरीराला दररोज २.४ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी-१२ ची आवश्यकता असते. त्यामुळे अतिरिक्त सेवन झाल्यास ते स्टोअर करुन ठेवणे आणि गरज भासल्यास त्याचा वापर करण्याचे तंत्र शरीराने विकसित केले आहे. हे तंत्र एवढे सबळ असते की तब्बल ३० वर्षांपर्यंत याचा वापर करता येऊ शकतो. यकृतात हे व्हिटॅमिन साठवून ठेवले जाते.
भारतातील ६०-७० टक्के जनसंख्या आणि शहरातील सुमारे ८० टक्के लोक या व्हिटॅमिनच्या कमतरतेने त्रस्त आहेत. देशात मानसिक आजार वाढत आहेत. त्यामागेही हेच व्हिटॅमिन आहे.

यातून मिळेल बी १२
ज्या जनावरांच्या ज्या अवयवांमध्ये हे व्हिटॅमिन असते त्यांचे आपण सेवन करत नाही. खमीर, अंकुरीत धान्य, शैवाल, दुग्धजन्य पदार्थ, सोया मिल्क, बटाटे, गाजर, मुळा, शलजम, बीट यांच्यात या व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असते. संतुलित भोजन ठेवल्याने हे व्हिटॅमिन मिळते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु