‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एखाद्या व्यक्तीला कोणता आजार आहे, हे जाणून घेणे तसे खूप अवघड असते. म्हणूनच डॉक्टर विविध प्रकारच्या रक्त, लघवी आणि अन्य तपासण्या पॅथॅलॉजी लॅबमधून करण्यास सांगतात. या तपासणीच्या अहवालावरून रूग्णाला कोणता आजार आहे हे समजते. फार पूर्वी नाडी परिक्षण करून आजाराविषयी निष्कर्ष काढला जात असे. नाडीचे ठोके काळजीपूर्वक जाणून मग आजाराविषयी सांगितले जात असे. परंतु, असेही काही मार्ग आहेत, ज्याद्वारे तुम्हाला कोणता आजार आहे ते समजू शकते. तळहातावरून सुद्धा व्यक्तीला कोणता आजार आहे, ते सांगता येते. ही पद्धत नेमकी काय आहे, याविषयी जाणून घेवूयात.

पिवळे तळहात
पिवळे हात असलेल्या व्यक्ती निरोगी नसतात. त्या कोणत्या न कोणत्या आजाराने नेहमी पिडीत असतात. त्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आढळते. याच कमतरतेमुळे रोग प्रतिकारशक्ती क्षमता कमी होऊन विविध आजार त्यांना जडू शकतात. तसेच त्यांना पोटाचे आजार होण्याची शक्यता असते.

गुलाबी तळहात
गुलाबी रंगाचा तळहात असणारांचे आरोग्य चांगले असते. त्यांना कोणत्याही प्रकारचा गंभीर आजार होत नाही. वयानुसार जे आजर होण्याची शक्यता असते, ते आजारही खूप कालावधीनंतर त्यांना होतात. म्हणजेच गुलाबी हात असणारे लोक निरोगी जीवन जगतात.

निळे, हिरवट तळहात
ज्यांचे तळहात निळे असतात त्यांचे आरोग्य फार चांगले नसते. वरून ते निरोगी वाढत असले तरी ते एखाद्या अंतर्गत आजाराने त्रस्त असू शकतात. अशाप्रकारचे हात असणारी व्यक्ती हृदयाशी संबंधित आजाराने पिडीत असू शकते. अशा व्यक्तींमध्ये नशा करण्याची प्रवृत्ती जास्त प्रमाणात असते. त्यांच्या शरीरात रोग प्रतिकारकशक्ती कमी प्रमाणत असते.

काळे तळहात
काळे तळहात हे दीर्घअजाराचे लक्षण आहे. अशा व्यक्ती वेळेआधीच वृद्ध दिसू लागतात. त्यांना एकपेक्षा जास्त आजार होण्याची शक्यता अधिक असते.

लाल तळहात
लाल तळहात असणारे उच्चरक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशरच्या आजाराने पिडीत असू शकतात. त्यांना लवकर राग येतो. अशा व्यक्तींना कंबरदुखी आणि पोटाचे आजार जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. अशा व्यक्तींना दारू किंवा इतर आमली पदार्थांचे व्यसन असू शकते. त्यांना हृदयविकार, मधुमेह, अर्धांगवायू असे आजार होण्याची शक्यता जास्त असते.

पांढरे तळहात
ज्यांचे तळहात पांढरे असतात, ते सामान्यतः अस्वस्थ असतात. अशा व्यक्तींना एखादा तरी आजार नक्की असतो. या आजारामुळे त्यांना शारीरिक थकवा सतत जाणवत असतो. त्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते. एकदा आजारी पडल्यानंतर यांना परत पूर्ववत होण्यासाठी खूप वेळ लागतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु