‘या’ १५ आजारांवर दही रामबाण उपाय, जाणुन घ्या कोणते आजार 

‘या’ १५ आजारांवर दही रामबाण उपाय, जाणुन घ्या कोणते आजार 

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दही आरोग्यासाठी खूप गुणकारी समजले जाते. प्राचीन काळापासून दह्याचा वापर आहारामध्ये केला जात आहे. दही हे दुधापेक्षा लवकर पचते. दात आणि हाडांना मजबूत करणारे कॅल्शियम दुधापेक्षा दह्यामध्ये जास्त असते. अपचन, बध्दकोष्ट, गॅस अशा समस्यांवर लस्सी, ताक हे लाभदायक ठरते. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी सारखी पोषकतत्त्व भरपूर असल्याने दह्याचे नियमित सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.

हे उपाय करा

* दात येत असलेल्या लहान मुलांना दह्यासोबत मध मिळवून चाटवावे. दात निघतांना जास्त त्रास होत नाही.

* मूळव्याध असलेल्या लोकांना दुपारच्या जेवनानंतर एक ग्लास ताकात ओवा टाकुन प्यायल्याने फायदा होतो.

* वजन कमी असेल तर दह्यामध्ये मनुके, बदाम टाकुन दिल्याने वजन वाढते. तसे पाहिले तर दहीच्या सेवनाने शरीराची अतिरिक्त चरबी कमी करता येते.

* दही शरीरावर लावुन अंघोळ केल्याने त्वचा सुंदर आणि कोमल बनते. दहीमध्ये लिंबूचा रस मिळवून चेहरा, मान, टाचा, हाताचे कोपर यावर लावल्याने शरीरर उजळते.

* केसांना सुंदर आणि आकर्षक ठेवण्यासाठी दही किंवा ताकाने केस धुतल्याने फायदा होतो. यासाठी अंघोळीअगोदर केसांची दह्यांने चांगल्या प्रकारे मालिश करावी. काही काळानंतर केसांना धुवून घ्यावे, केसांची चमक वाढते.

* दह्याची साय तोंड आलेल्या जागेवर दोन-तीन वेळा लावल्याने तोंड येण्याची समस्या दूर होते. दही आणि मध समान प्रमाणात मिळवुन सकाळ-संध्याकाळी सेवन केल्याने तोंड येण्याची समस्या दूर होते.

* दही रोग प्रतिकारक क्षमता वाढवते. यामुळे दमा आणि अ‍ॅलर्जीच्या आजारांपासुन वाचता येते. दातांसंबंधीत समस्यांसाठीही दहीचे सेवन फायदेशीर असते.

* उन्हाळ्याच्या दिवसात खुप जास्त घाम येतो. अशात दही आणि बेसनच्या मिश्रणाने मालिश करावी. काही वेळानंतर अंघोळ करावी. यामुळे घामाची दुर्गंध दूर होईल.

* रात्री झोप न येण्याची समस्या असेल तर नियमित जेवणासोबत एक वाटी दही सेवन करावे.

* दही रक्तातील कमतरता आणि अशक्तपणा दूर करते. दूध जेव्हा दहीचे रुप घेते तेव्हा दूधातील शर्करा आम्लाचे रुप घेते. यामुळे पचनक्रियेत मदत मिळते. ज्या लोकांना खुप कमी भूक लागते त्यांना दहीचा खुप फायदा होतो.

* दह्याचे ताक किंवा लस्सी बनवुन प्यायल्याने पोटातील उष्णता शांत होते. पोट खराब झाल्यावर जर दहीमध्ये ईसबगोलची भूसा टाकुन प्यायला तर फायदा होईल.

* दह्याच्या नियमित सेवनाने आतड्यांचे रोग आणि पोटासंबंधीत आजार होत नाही.

* यात हाय ब्लड प्रेशर आणि मूत्रपिंडाचे आजार थांबवण्याची क्षमता असते. हे कॉलेस्ट्रॉलला वाढण्यापासुन थांबवते आणि हृदयाचे ठोके योग्य ठेवते.

* दह्यामध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम असते. हे हाडांच्या विकासासाठी मदत करते. सोबतच हे दात आणि नखांसाठी फायदेशीर असते. यामुळे मासपेश्यांना योग्य प्रकारे काम करण्यात मदत मिळते.

* हींगाची फोडनी टाकुन दही खाल्ल्याने जॉइंटपेन होत नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु