दही खाण्याची पद्धतदेखील वाढवू शकते तुमचे वजन, जाणून घ्या

दही खाण्याची पद्धतदेखील वाढवू शकते तुमचे वजन, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –  रोजच्या आहारात दही खाणे खूप चांगले समजले जाते. दही प्रोटिन्सचे उत्तम स्रोत असल्याने काही लोक दररोजच्या जेवणात दही आवर्जून खातात. यामुळे वजनही नियंत्रणात राहते. अनेकदा चूकीच्या पद्धतीने दही खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामळे दही खाण्याची योग्य पद्धत जाणून घेणे खूप महत्वाचे ठरते.
ही काळजी घ्या

* दही नियमित आहारात घ्यावे, परंतु त्याचे प्रमाण सारखे असावे. एका मोठ्या वाटीत सहा मोठे चमचे दही येते. म्हणून दह्यासाठी लहान वाटी घ्यावी.

* दही खरेदी करताना त्यावरील माहिती काळजीपूर्वक वाचा. दह्यातील कॅलरी आणि प्रोटीनचे प्रमाण तपासावे. बंद पाकिटातील दह्यामध्ये १०० कॅलरी आणि प्रोटीनचे प्रमाण असते. १२-१५ ग्रॅम प्रोटीन असलेले दही खरेदी करावे.

* दही दुधापासून बनते. दुधापासून बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामध्ये साखर असते. बहुतांश महिलांना फ्लेवर्ड दही आवडते, ज्यामध्ये साखर जास्त असते. जर एका चमचामध्ये १८ ग्रॅमपेक्षा जास्त साखर दह्यात असेल तर त्यामुळे वजन वाढते.

* दह्यासोबत इतर पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. दह्यामध्ये फ्रुटस टाकून खाल्यास अ‍ॅसिडिटी होते. डायफ्रुट‌्स टाकल्यास ते केवळ दही राहत नाही. स्नॅक म्हणून घेत असल्यास त्यामध्ये इतर काही पदार्थ घेऊ शकता. अन्यथा यामुळे वजन वाढते.

* काहींना आयस्क्रीमऐवजी फ्रोजन योगर्ट आवडते. परंतु, फ्रोजन योगर्ट म्हणजेच फॅट योगर्ट होय. यातून शरीरात जास्त फॅट जाते. त्यामुळे घरी बनवलेले दही खावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु