चुकीच्या ‘लाइफस्टाइल’चे मन आणि शारीरावर होतात ‘हे’ ६ गंभीर परिणाम

 
चुकीच्या ‘लाइफस्टाइल’चे मन आणि शारीरावर होतात ‘हे’ ६ गंभीर परिणाम

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : निद्रानाश, रात्री झोपेत काही क्षणांसाठी थेट श्वासच बंद होणे, आदी घातक परिणाम हे चुकीच्या लाइफस्टाइलमुळे होऊ शकतात. झोपेवर झालेल्या या परिणामांची दखल योग्यवेळी घेतली नाहीत तर हा विकार वाढत जाऊन नैराश्यसुद्धा येऊ शकते.

हे लक्षात ठेवा
१ झोपेच्या तक्रारींकडे बिलकूल दुर्लक्ष करू नका.
२ जागरणामुळे केवळ झोपच नाही, तर आयुष्यच बेचव होऊ शकते.
३ झोपेच्या तक्रारी वाढत जाऊन नैराश्य कसे येते याचे ठोस कारण संशोधकांना सापडलेले नाही.

हे आहेत परिणाम
* फार शारीरिक कष्ट करीत नसतानाही झोपेच्या तक्रारी सुरू झाल्यास निद्रानाशाकडे वाटचाल होते.
* झोपेत काही क्षणांसाठी श्वास बंद होणे, सुरू होणे असे त्रास होतात. नंतर नैराश्याकडे वाटचाल होऊ शकते.
* मानसिक आणि शारीरिक तक्रारी वाढतात.
* रात्री झोप न आल्यामुळे विश्रांती होत नाही आणि थकल्यासारखे वाटते.
* सतत ताण, काळजी, चुकीची लाइफस्टाइल, औषधे यामुळे झोपेच्या तक्रारी वाढतात. नंतर नैराश्य येते.
* स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना हा विकार जास्त होतो.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु