‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अलिकडे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण खुपच वाढत चालले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील याची गंभीर दखल घेतली आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे या आजाराचे प्रमाण वाढत चालल्याचे संशोधकांचे मत आहे. मात्र, अशा घातक आजाराला दूर ठेवण्यासाठी काही विशिष्ट पदार्थांचे सेवन करणे खुपच गुणकारी ठरते. ब्रेस्ट कॅन्सरवर गुणकारी असलेल्या काही वनस्पतींमधील रासानिक गुणधर्मावर संशोधक काम करत आहेत. ब्रेस्ट कॅन्सरला आळा घालण्यात सक्षम असणारे कोणते पदार्थ आहेत, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

रताळे हे ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी खूप उपयुक्त असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. यामध्ये अँटीओक्सिडेंट्सची मात्रा भरपूर असते. रताळ्याच्या आवरणामध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण भरपूर असते. महिलांनी दररोज रताळ्याचे सेवन केल्यास ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. रताळ्याचा ज्यूस प्यायल्यास ब्रेस्ट कॅन्सरच्या कोशिकांची वृद्धी होत नाही आणि नवीन कॅन्सर कोशिका निर्माण होणे बंद होते. तसेच लाल द्राक्षेसुद्धा या आजारावर गुणकारी आहे. लाल आणि मोठ्या आकराच्या द्राक्षामध्ये अँटीओक्सिडेंट्स भरपूर असतात. ही द्राक्ष खाल्ल्याने कॅन्सर कोशिकांची वृद्धी कमी होत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.

सफरचंदसुद्धा ब्रेस्ट कॅन्सरवर चांगला उपाय आहे. लाल आणि गुलाबी रंगाच्या सफरचंदमध्ये एन्थोसायनिन्स आणि क्वेरसेटिन नावाचे रसायन भरपूर प्रमाणात असते. हे रसायन कॅन्सर कोशिकांची वृद्धी रोखण्यात सक्षम असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. त्याचप्रमाणे गाजरदेखील या गंभीर आजारावर लाभदायक आहे. गाजरामाध्ये भरपूर प्रमाणात बीटा कॅरोटीन रसायन आढळून येते. यामध्ये अँटीओक्सिडेंटचे गुण असतात.

डाळींबाच्या दाण्यांमध्ये एरोमाटेज नावाच्या अँन्झाइमची क्रियाशीलता कमी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरवर ते खुप गुणकारी ठरते, असे प्रयोगात आढळून आले आहे. पत्ता कोबीसुद्धा या आजारावर गुणकारी आहे. यामध्ये इंडोल-३-कार्बिनोल नावाचे रसायन भरपूर प्रमाणात असते. आधुनिक संशोधनानुसार या रसायनामुळे स्तन कॅन्सर होण्याची शक्यता खूप प्रमाणत कमी होते. तसेच बीटसुद्धा ब्रेस्ट कॅन्सरवर रामबाण उपाय आहे. बीटचा काढा मल्टी-ऑर्गन ट्युमर्सची वृद्धी रोखू शकतो. या काढ्याचा वापर इतर कॅन्सरवर उपयोगी पडतो का, याचा शोध आता संशोधक घेत आहेत. यामुळे कॅन्सर औषधींचे साईड इफेक्ट कमी करण्यात मदत होऊ शकते. तसेच लाल मुळ्यामध्ये जास्त प्रमाणात असलेले अँटीओक्सिडेंट्स ब्रेस्ट कॅन्सरच्या कोशिका वाढू देत नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु