महिलांनी गरोदरपणात मोबाईलचा वापर कमी करावा, अन्यथा ‘हे’ आहेत धोके !

महिलांनी गरोदरपणात मोबाईलचा वापर कमी करावा, अन्यथा ‘हे’ आहेत धोके !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – गरोदरपणात मोबाईलचा अतिवापर करत असलेल्या मातांच्या पोटी जन्मलेली मुले हायपर अ‍ॅक्टिव्ह असतात. मोबाईलच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे मुलांवर हा परिणाम होतो. बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोब हेल्थ यांच्यावतीने लॉरा बिक्र्स यांनी आणि त्यांच्या टीमने केलेल्या संशोधनात हे आढळून आले आहे.

असे झाले संशोधन

१) डेन्मार्क, स्पेन, नॉर्वे, नेदरलॅण्डस आणि कोरिया या देशातल्या ८० हजार मातांचा आणि मुलांचा अभ्यास करण्यात आला.

२) गरोदरपणात ज्या माता मोबाइलवर जास्त वेळ बोलत होत्या त्यांच्या मुलांना आता वर्तन समस्या अधिक आहेत.

३) अशा मुलांमध्ये केवळ वर्तन समस्याच नाही तर भावनिक समस्याही अधिक असल्याचे आढळले.

४) ज्या मातांनी मोबाईल वापरलाच नाही किंवा अगदी कमी वापरला त्यांची मुले तुलनेने शांत आणि भावनिक दृष्ट्या स्थिर होती. मात्र ज्या माता मोबाईलवर अधिक बोलत त्यांची मुले जास्त अस्वस्थ, तडतडी, आणि चिडचिडी आढळून आली.

५) पालकांचा स्वभाव, ते कशाला महत्व देतात, पोटातल्या बाळाशी संवाद, मूल झाल्यानंतर पालकांचे वर्तन, मुलांकडे लक्ष, यागोष्टी खुप महत्त्वाच्या आहेत.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु