महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – महिला घरात सगळ्यांची काळजी घेतात पण स्वतः हा कडे मात्र दुर्लक्ष करतात. आणि त्यात जर ती विवाहित आणि काम करणारी असेल तर ती वेळेवर जेवत नाही आणि पुरेशी झोपही घेत नाही. यामुळे तिच्या आरोग्यवर परिणाम होत असतो. मग आज अशाच महिलांसाठी काही टिप्स जे त्यांना हेल्दी ठेवण्यात मदत करतील.

image.png

– सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेवर जेवण केले पाहिजे. तुम्ही कितीही पौष्टिक अन्न खावा पण ते वेळेवर खाले पाहिजे. आपल्या जेवणात पालेभाजी, फळभाज्यांचा समावेश करा. आणि रोज मूठभर भिजवलेले बदाम नक्की खा.

– जास्त नाही पण किमान दिवसातून एक तरी फळ खालेच पाहिजे. फळ शरीराला आतून मजबुती देते. सफरचंद शरीरासाठी खूपच उत्तम मानले जाते.

– स्वतःला एनर्जी मिळण्यासाठी रोज सकाळी कोमट पाणी प्यावे. सकाळी थोडा वेळ फिरायला जावे आणि हलका व्यायाम करावा.
– मासिक पाळी जर वेळेवर येत नसेल तरीही महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. अशा वेळी गाजरच्या ज्युसचा सेवन करावा. यामुळे खूप फायदा होतो.

– शक्यतो बाहेरचा ऑयली-जंक फूड टाळा. आणि हिरव्या पालेभाज्यांचा जेवणात समावेश करा. तसेच रोज प्राणायम करा.

– तणाव जाणवल्यास मेडिटेशन किंवा योगा करा. यामुळे तुम्हाला तणाव मुक्त वाटेल. तसेच सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी व्हा आणि मैत्रिणींसोबत वेळ घालवा.

– कामाच्या थकवा मुळे झोप येत नसेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करा. किंवा मसाज,स्पा करा. यामुळे थकवा कमी होतो आणि झोप नीट लागते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु