महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण

महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – स्त्रियांच्या शरीरात टेस्टेस्टेरॉनची पातळी कमी असल्याने पौगंडावस्थेनंतर त्यांना दमा होण्याची शक्यता पुरूषांपेक्षा जास्त असते. पुरुषांमधील प्राथमिक लैंगिक हॉर्मोन्स दम्याची अ‍ॅलर्जी रोखतात. त्यामुळे पुरुषांना दमा होण्याची शक्यता कमी असते, असे फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात आढळून आले आहे.

संशोधनातील निष्कर्ष

१) दम्याच्या लिम्फोसाईट आयएलसी-२एस पेशींची वाढ टेस्टेस्टेरॉनमुळे रोखली जाते. यामुळे पुरूषांचे दम्यापासून संरक्षण होते.
२) पुरुषांमध्ये हे जास्त असल्याने त्यांना दम्याचा त्रास कमी होतो.
३) या संशोधनामुळे स्त्रियांसाठी दम्यावर नवीन उपचार पद्धती शोधणे सोपे होणार आहे.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु