‘या’ उपायाने १५ दिवसात त्वचा होईल नितळ, आवश्य करून पहा ‘हा’ उपाय

‘या’ उपायाने १५ दिवसात त्वचा होईल नितळ, आवश्य करून पहा ‘हा’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – त्वचा उजळ आणि चमकदार करण्यासाठी एक दमदार उपाय आहे. या उपायाने त्वचेत लवकर फरक दिसून येतो, शिवाय हा उपाय खुप सोपा आणि स्वस्तही आहे. मात्र, योग्य पध्दतीने तो करण्याची गरज आहे. सुमारे १५ ते ३० दिवसात या उपायाचा गुण दिसून येतो. हा उपाय करण्यासाठी दूध आणि चारोळी या २ पदार्थांची गरज असते. शिवाय तुम्ही घरच्या घरी तो करु शकता.

अस तयार करा लेप

एक वाटी दूधात १२ ते १५ चारोळ्या रात्री भिजवून ठेवा. सकाळी भिजलेल्या दूध आणि चारोळीची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा, मान आणि हातांवर लावा. यानंतर १५ मिनिटे थांबा.

ही पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. हा उपाय रोज करा. चारोळी आणि दूध गरजेप्रमाणे घ्यावे. १५ ते ३० दिवसात त्वचा उजळ आणि तजेलदार होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु