‘या’ घरगुती उपायांनी कमी करा मानेचा सावळेपणा

‘या’ घरगुती उपायांनी कमी करा मानेचा सावळेपणा
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेक महिला आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी अनेक टिप्स वापरतात. त्यांचं सगळं लक्ष चेहरा गोरा करण्याकडे असत. पण चेहऱ्याच्या नादात त्यांचं मानेकडे लक्ष राहत नाही. पण तुमची मान जर काळी असेल तर चेहरा गोरा असून काही उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्ही जेवढ लक्ष चेहऱ्याकडे तेवढच लक्ष मानेकडे द्या. कारण चेहरा आणि मान दोन्हीही उन्हात काळे पडत असतात. त्यामुळे दोन्हीकडे सारखेच लक्ष देणे गरजेचे आहे.

बटाट्याचा मास्क :

१) बटाटा हे डोळ्याच्या खालचे डार्क सर्कलच नाही. तर मानेचा काळेपणा दूर होतो. त्यासाठी २ बटाटे मिक्सरमध्ये बारीक करा. जो रस तयार झाला आहे. त्याला कॉटनच्या कापडातून गाळून घ्या. त्या रसात लिंबाचा रस मिक्स करा. आणि ते मानेच्या काळ्या भागावर लावा. १५ मी. नंतर तुमची मान हळू हळू चोळा आणि पाण्याने धुवून काढा. त्यानंतर मानेला मध लावून मानेचा मसाज करा. असं काही दिवस केलं तर तुमच्या मानेचा काळेपणा निघून जाईल.

बबट्यामध्ये कैटकोलेस नावाचे तत्व असते. ते मानेला नॅचरल ब्लिचिंग करते. आणि लिंबू हे ब्लिचिंग आणि स्किन लायटनिंगचे गुणधर्म असतात. त्यामुळे मानेचा काळेपणा दूर होतो.

२) बेसन आणि तांदळाचा मास्क :

मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी बेसन आणि तांदळाचा मास्क लावता येतो. त्यासाठी दोन चमचे बेसनामध्ये अर्धा चमचा हळद आणि १ चमचा तांदळाचं पीठ मिक्स करा. त्यात एका लिंबाचा रस पिळा. आणि आता ते सर्व मिश्रण योग्य प्रकारे मिक्स करून घ्या. आणि मानेला लावा. अर्धा तास तसेच ठेऊन नंतर ते चोळून घ्या. आणि धुऊन टाका. साबणाचा उपयोग करू नका.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु